महागाव तालुक्यातील पशु दवाखाने सलाईन वर

महागाव तालुक्यातील पशु दवाखाने सलाईन वर

प्रभारी अधिकऱ्यामुळे जनावरावरील उपचार बंद: पशु चिकित्सालय कुलूपबंद

महागाव (राम जाधव) : तालुक्यातील अनेक पशु वैद्यकीय चिकित्सालयाची दुरावस्था झाली असून अपुरे व प्रभारी पशुधन अधिकारी डॉक्टर असल्यामुळे जनावरांवर वेळेवर उपचार होत नाही.त्यामुळे उपचारा अभावी जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. पंचायत समिती परिसरात असलेले पशु चिकित्सालय व पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त जगामुळे सलाईन वर आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे सर्व पशु पक्षाचे उपचाराअभावी हाल होत आहेत.तोडक्या पशु वैद्यकीय अधिकऱ्याना जनावरावर उपचार करण्याची पाळी आली आहे.

कृषिप्रधान देशात शेती पूरक उद्योग म्हणून पशु पालकांकडे पाहिल्या जाते. त्यामुळे या विभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने स्वतंत्र पशुसंवर्धन खाते निर्माण केले आहे. परंतु सुरुवातीपासूनच या खात्याला कायम दुय्यम दर्जा देण्यात आल्याने या विभागाचा कार्यभार गतिमान होण्याऐवजी मंदावत चालला आहे. पशुधन अधिकारी व पर्यवेक्षकासह अनेक पदांवरील जागा रिक्त असल्याने पशुधनाचा विकास खुंटल्याचे चित्र दिसून येत आहे.तालुका पशुधन अधिकऱ्याचा प्रभार उमरखेड येथील बालूदास राठोड यांच्याकडे देण्यात आल्याने त्यांचे कार्य मात्र पुसद वरूनच सुरू असल्याने जनावरांवर उपचार करणे आता अडचणीचे ठरले आहे.अनेक पशू वैद्यकीय दवाखान्यात सोइ सुविधा नाही.अनेक परिचराच्या जागा मंजूर असताना जागा रिक्त आहेत.अन्य शासकीय कार्यालया प्रमाणे कुठल्याही सोइ सुविधा पशु वैद्यकीय अधिकऱ्याना निस्वार्थ पणे जनावरांवर उपचार करण्यात येत आहेत. गुंज, फुलसावंगी, काळी दौ, खडका, सवना, मुडाना, हिवरा, महागाव येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात जनावरावर उपचार करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने तालुका स्तरावर असलेले पशुधन विकास अधिकऱ्याचे कायमस्वरूपी भरून रिक्त असलेल्या कर्मचाऱ्याच्या जागा तात्काळ भरण्यात यावा अशी मागणी पशुपालक वर्गातून केल्या जात आहव.

About The Author