गोपनीयतेचा भंग करणारे अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई करा – आ.धीरज देशमुख
हातात फलक घेवून काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गोस्वामी चा केला निषेध
लातूर (प्रतिनिधी) : देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोपनीय व संवेदनशील माहिती आपल्या चॅनल वरून प्रसारित केल्याने गोपनीयतेचा भंग करणारे अर्णब गोस्वामी यांच्यावर तातडीने केंद्र सरकारने कारवाई करावी उघडा डोळे बघा नीट असा इशारा आमदार धीरज देशमुख यांनी दिला असून यासाठी तालुका शहर, ग्राम पातळीवर तीव्र आंदोलन करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
प्रदेश काँग्रेस च्या सूचनेनुसार राज्यभरात अर्नब गोस्वामी यांच्यावर कारवाईसाठी आंदोलन धरणे सुरु असून त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी लातूर येथे काँग्रेस च्या वतीने काँग्रेस भवन समोर पेंडाल टाकून आंदोलन करण्यात आले त्यावेळी आमदार धीरज देशमुख बोलत होते. पुढें बोलताना आमदार धीरज देशमुख म्हणाले की देशाचे पंतप्रधान, संरक्षण विभाग, गृह विभागाची , प्रसारण मंत्रालय कडील यांच्याकडून संवेदनशील माहिती कशी मिळते असा सवाल करत गोपनीयता भंग या गोस्वामी ने केला असून सुरक्षा धोक्यात येईल असे त्यांच्या चॅनल वरून प्रसारित केल्याने हा देशाचा अपमान असून यासाठी तातडीनं या चॅनल वर बंदी घालून केंद्र सरकारच्या संरक्षण विभाग गृह विभागाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी करत लवकर कारवाई न झाल्यास राज्य, देशभरात काँग्रेस पक्ष रस्त्यावर येऊन आंदोलन करणारं आहे असे सांगून काँग्रेसने देश जोडण्याचे काम केले असून देश तोडनार्यायावर गुन्हे दाखल करा त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली.
यावेळी जिल्हा शहर काँग्रेस चे अध्यक्ष अँड किरण जाधव, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया सरचिटणीस हरिराम कुलकर्णी, तालुका अध्यक्ष राजेसाहेब सवाई, जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे अल्पसंख्याक काँग्रेस चे अध्यक्ष ॲड.फारूख शेख, दगडुअप्पा मिटकरी, कैलास कांबळे, मनोज पाटील, महेश काळे, ॲड.देविदास बोरूळे पाटील, मोहन सुरवसे, प्रवीण सूर्यवंशी, सिकंदर पटेल, व्यंकटेश पुरी, विजयकुमार साबदे, हकीम शेख, असिफ बागवान, सुंदर पाटील कव्हेकर, स्वयंप्रभा पाटील, सुरेश चव्हाण, संजय ओहळ, किरण पवार, ॲड.प्रदीपसिंह गंगणे, रणधीर सुरवसे, दत्ता मस्के, सुपर्ण जगताप, एकनाथ पाटील, मनोज देशमुख, युनूस मोमीन, सुधीर आणवले, प्रा.एम.पी.देशमुख, हमीद बागवान, रमेश सूर्यवंशी, पंडित कावळे, यशपाल कांबळे, धनराज शेळके, प्रवीण कांबळे, पुनीत पाटील, अमित जाधव, सुनीत खंडागळे, कुणाल वागज, राजू गवळी, राहुल डुमणे, अभिषेक पतंगे, अकबर माडजे, युनूस शेख, बालाजी झिपरे, श्रावण मस्के, मारुती बानाटे, हाजी मुस्तफा, शेख अब्दुल्ला, आदिल इनामदार, सतीश कांबळे, प्रमोद आरसुडे, तबरेज तांबोळी, ॲड.अजित काळदाते, हनुमंत जगदाळे, ताहेर सौदागर, शिवाजी सिरसाट, मैनोद्दीन शेख, आयुब शेख, भूषण घोडके, अभिजित आपटे, संतोष नाईकवाडे, आशुतोष मूळे, पांडुरंग बोडके, विजय टाकेकर, विशाल कांबळे, संजय सूर्यवंशी, दिलीप भडंगे, गणेश ढगे, रमाकांत गडदे, बालाजी सोनटक्के, अभिजित इगे, राम चामे आदी विविध काँग्रेस सेल चे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.