लातूर ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी विष्णू भिसे यांची बिनविरोध निवड
लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या लातूर अध्यक्ष पदी विष्णू भिसे तर उपाध्यक्ष पदी शंकर आदमाने याची निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डी एन इ 136 लातूर शाखा येथील कार्यकारणीची निवड जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशानुसार दि. 30 सप्टेंबर रोजी लातूर पंचायत समिती च्या सभागृहात राज्य सल्लागार आर. जी. कांबळे व सहसचिव संदीप राठोड यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना ही सदैव ग्रामसेवकांच्या न्याय हक्कासाठी राज्यामध्ये काम करत असते. ग्रामसेवकांना न्याय मिळवून देणे त्यांच्या अडीअडचणी दूर करणे या सर्व बाबीवर ही संघटना सतत प्रयत्नशील असते. लातूर येथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेल्या लातूर ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी विष्णू भिसे यांची बिनविरोध निवड तर उपाध्यक्षपदी, शंकर आदमाने, महिला अध्यक्षपदी अशा उस्तुर्गे तर सचिवपदी सुधीर धारूरकर यांची निवड झाली. ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या
तसेच ग्रामसेवक संघटनेचे सचिव पदी सुधीर भारत खेडकर, उपाध्यक्ष शंकर भानुदास आदमाने, उपाध्यक्ष अमरसिंग राजरतसिंग चव्हाण, उपाध्यक्ष आशा उस्तुर्गे, कार्याध्यक्ष भोसले शंकर, मानद अध्यक्ष आनंत सूर्यवंशी, सल्लागार रेड्डी प्रशांत, सहसचिव पटवारी शिवकांत, कोषाध्यक्ष गोमसाळे उत्तम, महिला संघटक ढोबळे, संघटक घाडगे संजय, प्रसिद्धीप्रमुख राहुल सुतार यांची निवड करण्यात आली आहे.