कर्तव्यावर जाण्यासाठी शिक्षकाने केले धाडस

कर्तव्यावर जाण्यासाठी शिक्षकाने केले धाडस

निलंगा (प्रतिनिधी) : निलंगा तालुक्यातील मौजे हालसी (तुगाव) येथील महाराष्ट्र विद्यालय या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर असलेले टोपान्ना विश्वनाथ यांनी छाती इतक्या पाण्यातून चालत प्रवास करून शाळेत पोहोचले. हलसी या गावातील काही घरा मध्ये मांजरा नदीचे पुराचे पाणी शिरल्या मुळे त्यांची राहण्याची व्यवस्था गावातील शाळेमध्ये करण्यासाठी मा तहसीलदार व तलाठी यांनी फोन वर संपर्क साधून शाळा खुली करून देण्यासाठी सांगितल्याने मौजे नणंद येथील टोपन्ना यांनी गावातील लोकांची मदत करण्यासाठी गावातील ओढ्याच्या पाण्यातून आपली जीवाची पर्वा न करता, कर्तव्यात कसूर न करता तेथील गावातील लोकांची राहण्याची व्यवस्था करून दिली या धाडसी कर्तव्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!