अहमदपुरात कायदेविषयक शिबिर व कायदा विषयक माहिती रॅलीचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने दि. दोन ऑक्टोबर रोजी कायदेविषयक शिबिर व कायदा विषयक माहिती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालय परिसरातून सकाळी नऊ वाजता कायदेविषयक रॅली शहराच्या प्रमुख रस्त्यावरून मार्गस्थ होऊन तिचा समारोप शिवाजी चौकामध्ये होणार आहे. या रॅलीत जिल्हा न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश संभाजीराव ठाकरे, दिवाणी न्यायाधीश आशिष साबळे, दिवाणी न्यायाधीश शामराव तोंडचिरे, दिवाणी न्यायाधीश अतुल उत्पात, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, गट विकास अधिकारी अमोल कुमार अंबिलवाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्याला उपस्थित राहावे असे जाहीर आव्हान वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट हेमंतराव पाटील, सचिव एडवोकेट संतोष दराडे, उपाध्यक्ष एडवोकेट श्रीमती ए. बी.डक, सचिव एडवोकेट श्रीमती रोहिणी देशमुख, यांनी केले आहे.