मन, मनगट आणि मेंदू यांचा विकास म्हणजे शिक्षण – डॉ.भागिरथी गिरी
नांदगाव केंद्राची शिक्षण परिषद बोरवटी येथे संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : मुरूड डायटच्या गुणवत्ता विभाग प्रमुख डॉ.भागिरथी गिरी यांनी नांदगाव केंद्राच्या वतीने बोरवटी ता.लातूर येथे आयोजीत शिक्षण परिषदेस भेट देवून शिक्षकांशी मुक्त संवाद साधताना त्या म्हणाल्या की, मन,मनगट आणि मेंदू यांचा विकास ज्या प्रक्रियेतून सतत होत असतो ती प्रक्रिया म्हणजेच शिक्षण होय.
या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी नांदगाव केंद्राचे केंद्रप्रमुख बालाजी कोळी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बोरवटीच्या सरपंच सौ.अनुजा नाथजोगी, उपसरपंच अमोल माने, ग्रामपंचायत सदस्य संतोष ढमाले, गणेश नाथजोगी, ग्रामसेवक श्री मडके, शाळा व्वस्थापन समिती अध्यक्षा मीराताई ढमाले, केंद्रीय मुख्याध्यापक सोनाजी भंडारे, समावेशीत शिक्षण बिआरसी लातूर चे श्री शिंदे के.एस.यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या भविष्यवेधी शिक्षणाचा विचार करताना खर्या अर्थाने शिकतं होण्यासाठी मुलांच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाची दखल घेणारं आमच्यातील शिक्षकत्व अंतर्बाह्य सम्रध्द आणि सजग झालं पाहिजे. लातूर जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या प्रेरणेने व पुढाकाराने जिल्हाभरातील शाळांत चालू असलेल्या बाला उपक्रमामुळे शिक्षण प्रक्रियेच्या भौतिक बाबतीत खूप मोठी साथ मिळत आहे.जगाला हवं असलेलं गुणवत्तापूर्ण व दर्जेदार मूल जिल्हा परिषद शाळेतून घडायला हवेत असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या सोबत उपस्थित झालेले डायटचे सतिश भापकर, प्रभाकर हिप्परगे, स्मिता मामीलवाड यांचेही मार्गदर्शन झाले.
दिवसभरात या शिक्षण परिषदेतून बहूविध बुध्दीमत्ता,बाला उपक्रम,२१ व्या शतकातील कौशल्ये, स्वच्छ विद्यालय,अभ्यासमाला व स्वाध्याय उपक्रम, माहिती तंत्रज्ञान ईत्यादी विषयावर केंद्र साधनव्यक्ती नजीऊल्ला शेख, माधूरी वलसे, मंगला डोंगरे, अंकूश चव्हाण यांनी पिपीटी च्या माध्यमातून शिक्षकांशी चर्चात्मक संवाद साधला.
यावेळी नुकतेच तालुकास्तरीय गुरूगौरव पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा व बाला उपक्रमात शाळेवर भरीव कार्य केलेल्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाजी भंडारे यांनी केले. सुत्रसंचलन श्रीम,किरण आरदवाड यांनी तर आभार श्रीम.काळे विजया यांनी मानले. यशस्वितेसाठी कटके प्रतिभा, राठोड मनकर्णा, भद्रे रंजना, सूर्यवंशी अनिता व तांबोळी मुक्तार यांनी परिश्रम घेतले.