शिरूर ताजबंद येथे विविध उपक्रम घेऊन जेष्ठ नागरिक दिन साजरा

शिरूर ताजबंद येथे विविध उपक्रम घेऊन जेष्ठ नागरिक दिन साजरा

ताजबंद (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ग्रामपंचायत कार्यालयांच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळे विरंगुळा केंद्राचे उद्घाटन सरपंच सावित्राताई पडोळे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्राथमिक आरोग्य केंद्रात जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले तर जेष्ठ नागरिकांना तलाठी कार्यालयाच्या वतीने सात बारा वाटप करण्यात आला व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आठ अ चा उतारा वाटप करत विविध उपक्रम घेऊन जेष्ठ नागरिक दिन मोठया उत्सहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपसरपंच प्रताप पाटील, ग्रामपंचायत बांधकाम सभापती विक्रम भोसले, ग्रामपंचायत पाणीपुरवठा सभापती रणधीर पाटील,समुदाय अधिकारी शोभा घोडके, तलाठी नवनीत जामणिक, डॉ.मारोती पाटील, औषध निर्माण अधिकारी राजेश राठोड, राजू गाडे, कृष्णा नामवाड, बब्रुवान बेबडे, सुरेश स्वामी,आरोग्य परिचारीका चंद्रकला दापके,द्रुपदा कांबळे, सह शिक्षिका अल्पना बारुळे, सह शिक्षिका ज्योती स्वामी, सह शिक्षिक गणेश मुसणे यांच्या सह आधीची उपस्थिती होती.
सध्यसथित वातावरणात बदल झाल्याने वृद्ध नागरिकांस ताप सर्दी व वयोमानानुसार मधुमेह व ब्लड प्रेशर नी वृद्ध गृहस्थ आजारी पडत असल्याने आज १ ऑक्टोबर हा जेष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.कोरोना कालात अनेक वृद्ध लोक दगावले असल्याने “थोडेसे मायबापासाठी पण” या महत्त्वपूर्ण योजनेतुन आज जेष्ठ नागरिक दिन महनुन शिरूर ताजबंद ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिपिक टोफिक किणीवले, संगणक परिचालक मारोती सरवदे, गंगाधर बैकरे, शुभम जगदाळे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच प्रताप पाटील यांनी केले. सुत्रसंचलन ग्रामविकास अधिकारी उत्तम भदाडे यांनी केले तर आभार निरीक्षक तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी शोभा घोडके यांनी मानले. या कार्याक्रमासाठी येणाऱ्या जेष्ठ नागरिकांना जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

About The Author