दिलीपराव देशमुख यांनी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नुकसान झालेल्या विविध भागाची पाहणी केली

दिलीपराव देशमुख यांनी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नुकसान झालेल्या विविध भागाची पाहणी केली

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख मालक यांनी दि ३० सप्टें रोजी अहमदपूर तालुक्यातील किंनगाव परिसरातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिंकाचे नुकसान झाले आहे.

जोरदार पावसामुळे तालुक्यातील पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यांना मदत तर मिळालीच पाहिजे. सोयाबीन पिंकाचे विशेष नुकसान भरपाई शासनाने दिली पाहिजे. असे आव्हान शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिंकाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देण्यात आला. यावेळी रवी शिरसाठ, नाथराव तुडमे, राम चव्हाण, काशिनाथ वडसकर, नाथराव खांडेकर, तुकाराम शिरसाठ, गंगाधर शिरसाठ, श्रीहरी देवरकुंडे, शिवाजी शिरसाठ, सुदाम शिरसाठ, विठ्ठल खोडवे, संभाजी चव्हाण, व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!