अभिमानास्पद ! “वैभवशाली लातूर” या महाराष्ट्र शासनाच्या लातूर जिल्हा पर्यटन पुस्तिकेमध्ये वर्दीतील फोटोग्राफर धनंजय गुट्टे यांचे छायाचित्र

अभिमानास्पद ! "वैभवशाली लातूर" या महाराष्ट्र शासनाच्या लातूर जिल्हा पर्यटन पुस्तिकेमध्ये वर्दीतील फोटोग्राफर धनंजय गुट्टे यांचे छायाचित्र

लातूर : या सचित्र पुस्तिकेचे प्रकाशन 15 ऑगस्ट 2021 रोजी मान्यवरांच्या हस्ते झाले असून त्या पुस्तिकेचे एक प्रत मा. उपजिल्हाधिकारी श्री गणेशजी महाडिक साहेबांनी मला दिली आहे. अतिशय सुरेख रंगीत सचित्र माहिती पुस्तिका आहे. लातूर जिल्ह्याचा वैभवशाली ठेवा यामध्ये दिलेला आहे तो आवश्य पाहण्यासारखा आहे. यामध्ये मुखपृष्ठ, अनुक्रमणिका, जलसंपत्ती आणि वन्यजीवसृष्टी या भागासाठी मी काढलेली छायाचित्रे समाविष्ट केलेली आहेत. या पुस्तकात ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, जैवविविधता, लातूर जिल्ह्यातील विशेषतः माहिती सचित्र छापली गेली आहे. सदरचे कॉफी टेबल बुक महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालय , व संपादक मंडळ म्हणून मा जिल्हाधिकारी पृथ्वीराजजी बी पी सर, उपजिल्हाधिकारी गणेशजी महाडिक सर, जीवनजी देसाई सर, सुनीलजी सोनटक्के सर, विवेकजी सौताडेकर सर, सुनीलजी पुरी सर यांचे विशेष प्रयत्न केले आहेत. तसेच यामध्ये इतरही फोटो कलादालन स्टुडिओ, इतर फोटोग्राफर आणि मांडणी के के ग्राफिक्स यांनी केली आहे. याचे ईबुक pdf स्वरूपात लवकरच आपल्या भेटीला येईल. याबद्दल प्रशासकीय मा. संपादक मंडळाचे खूप खूप कौतुक व मनःपूर्वक धन्यवाद !

धनंजय गुट्टे, वन्यजीवप्रेमी तथा महाराष्ट्र पोलीस, लातूर

About The Author