दयानंदच्या चार विद्यार्थ्यांना मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरीची संधी
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद कला महाविद्यालयामधील अनिमेशन विभागातील आणखी चार विध्यार्थ्यांना हैद्राबाद येथील रोटो मेकर या कंपनीमध्ये नौकरीसाठी संधी मिळाली आहे. त्यामध्ये हेमंत कांबळे, सम्यंक जाधव, शुभम मलबागे, अमर कांबळे हे आहेत. नुकतेच अनिमेशन विभागातील 12 विध्यार्थी नौकरीवर रुजू झालेले असताना आणखी 4 विद्यार्थ्यांची त्यात भर पडली आहे.
आज आपला भारत देश प्रगतीच्या अतिउच्च शिखराकडे वाटचाल करीत असताना कोरोना विषाणू म्हणजे Covid -19 सारखे संकट जगभर थैमान घालत आहे या दरम्यान आर्थिक असुरक्षितता निर्माण झालेली असताना अॅनिमेशनमधील 04 विद्यार्थ्यांना त्यामध्ये हेमंत कांबळे, सम्यंक जाधव, शुभम मलबागे, अमर कांबळे यांना रोटोमेकर प्रा.लि. हैद्राबाद इथे मॅच मुव्हींग आर्टिस्ट म्हणून नोकरी लागली आहे. या कंपनीमध्ये हॉलिवुड आणि बॉलिवुड चे पोस्ट प्रोडक्शन प्रोजेक्ट वर काम केले जाते. या वेळी अॅनिमेशन विभाग प्रमुख प्रा.दुर्गा शर्मा, प्लेसमेंट सेल चे प्रमुख प्रा.इरफान शेख, प्रा.मंगेश रापते, प्रा. सचिन पतंगे उपस्थित होते. शिक्षण हे सामाजिक समानता निर्माण करते त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर उत्प्रेरकाचे काम करतो असे तंत्रज्ञानावर आधारित कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी नवीन जगाची दारे उघडली जातात असे मत प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांनी व्यक्त केले. अॅनिमेशन हे क्षेत्र मनोरंजन क्षेत्रावर आधारित आहे. आणि मनोरंजन कधीच संपनारे नाही हे आपण लॉकडाऊन काळात अनुभवले म्हणून अॅनिमेशन क्षेत्रात कधीच रिसेशन येणार नाही अॅनिमेशनमध्ये प्रत्येक वर्षी पदवी पूर्ण होताच विद्यार्थ्यांना जॉब लागतात आणि ही परंपरा अॅनिमेशन विभागाने कायम ठेवली आहे. असे घवघवीत यश ॲनिमेशन मधील विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे. या स्तुत्य उपक्राबद्दल दयानंद शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शहा, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, सहसचिव सुरेश जैन, कोषाध्यक्ष संजय बोरा तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे व विभागातील प्राध्यापकांचे अभिनंदन केले.