शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी केली अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी
लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यामध्ये अतिवृष्टी होऊन मागील दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये मांजरा नदीचे पाणी शिरून शेतातील काढणीस आले सोयाबीन पिकाचे 100 टक्के नुकसान झालेले आहे . शेतकरी हतबल होऊन शासनाकडे मदतीचे हाक मारत असतानाच पूरग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी प्रशासनाला बाधित पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन संबंधित शेतकऱ्यांना ऑनलाइन तक्रार विमा कंपनी कडे करण्याचे आठ शितील करून लेखी स्वरूपात विमा प्रतिनिधीने जिल्ह्यातील तालुका कृषी कार्यालय यांनी बाधित पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी लातूर व जिल्हा विमा प्रतिनिधी यांच्याशी फोन वरून सुचना दिले. अर्ज स्वीकारण्याचे सूचना दिल्या. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात सर्व तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारले जात आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतः पूरग्रस्त भागाचा दवरा करत असून त्या दौर्यामध्ये त्या त्या तालुक्यात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एकही शेतकरी शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे सूचना देखील यावेळी दिल्या आहेत.
शिरूर आनंतपाळ तालुक्यातील मौजे उजेड नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने साहेब यांनी केली. अतिवृष्टीमुळे नदीकाठचा शेतकरी अत्यंत हतबल झाला असून, त्यांनी त्यांच्या व्यथा जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांना सांगितले. सद्यस्थितीचे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रुंचे पाणी पुसण्यासाठी ठाकरे सरकार तत्पर असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी यावेळी सांगितले. तसेच कोणत्याही प्रकारे लातुर जिल्हयातील एकही शेतकरी हा पीकविमा पासून वंचित राहता कामा नये, याची जबाबदारी पीकविमा जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी यांची आहे. पीकविमा प्रतिनिधीनी पंचनामे करताना ऑनलाइन ऑफलाईनच्या गोंधळात शेतकऱ्यांना अडकवू नये, अन्यथा शिवसेना व शिवसैनिक शांत राहणार नसल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख भागवत वांगे, काँग्रेस निलंगा तालुकाप्रमुख आबासाहेब पाटील, शि.अनंतपाळ सतीश शिवणे, शिरूर अनंतपाळ उपशहर प्रमुख अनंत काळे, तहसीलदार जटाळ साहेब, तालुका कृषी अधिकारी नाबदे साहेब, BDO चव्हाण साहेब व तसेच उजेडचे सरपंच हमीद पटेल व उजेड, डोबळेवाडी, निटुर, डोंगरगाव गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.