अहमदपुरात कायदेविषयक शिबिर व कायदा विषयक माहितीचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने दि. 3 ऑक्टोबर रोजी ठीक 11 वाजता. ग्लोबल इंग्लिश स्कूल च्या हॉल वर, कायदेविषयक शिबिर व कायदा विषयक माहितीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश संभाजीराव ठाकरे, दिवाणी न्यायाधीश आशिष साबळे, दिवाणी न्यायाधीश शामराव तोंडचिरे, दिवाणी न्यायाधीश अतुल उत्पात, यांच्यासह मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्याला उपस्थित राहावे असे जाहीर आव्हान वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट हेमंतराव पाटील, सचिव एडवोकेट संतोष दराडे, उपाध्यक्ष एडवोकेट श्रीमती ए. बी.डक यांनी केले आहे.