उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी केले सुर्यकर कुटुंबीयांचे सांत्वन
परळी वैजनाथ (गोविंद काळे) : येथील दै.दिव्यअग्नीचे संपादक प्रकाश सुर्यकर यांच्या मातोश्री श्रीमती सुशीलबाई पंढरीनाथ सुर्यकर यांच्या दुःखद निधनाबद्दल परळी पंचायत समिती उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी आज शनिवार, दि.02 आँक्टोंबर रोजी शहरातील निवासस्थानी भेट देऊन सुर्यकर कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच श्रीमती सुशीलबाई पंढरीनाथ सुर्यकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरातील दै.दिव्यअग्नीचे संपादक प्रकाश सुर्यकर यांच्या मातोश्री श्रीमती सुशीलबाई पंढरीनाथ सुर्यकर यांचे 95 व्या वर्षी दि.30 सप्टेंबर रोजी वृध्दपकाळाने दुःखद निधन झाले होते. श्रीमती सुशीलबाई पंढरीनाथ सुर्यकर ह्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात कामात त्यांचा सहभाग होता. तसेच त्यांच्या निधनाने कुटुंबियांचा आधारवड हरपला अशा शब्दात शौकभावना व्यक्त केल्या. यावेळी उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्यासह अशोक आघाव, शेख जावेद, कांबळे व इतरांनी सुर्यकर कुटुंबियांचे सांत्वन केले. दै.दिव्य अग्नीचे संपादक प्रकाश सुर्यकर व सुर्यकर परिवार उपस्थित होते.