सैनिकी विद्यालयात केंद्र प्रमुख सौ.प्रतिभा मुळे यांची सदिच्छा भेट

सैनिकी विद्यालयात केंद्र प्रमुख सौ.प्रतिभा मुळे यांची सदिच्छा भेट

उदगीर : श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात केंद्र प्रमुख सौ. प्रतिभा मुळे मॅडम यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यालयाची पाहणी केली.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून कमांडंट कमांडर बी के सिंग, केंद्र प्रमुख सौ. प्रतिभा मुळे मॅडम, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कमांडंट कमांडर बी के सिंग आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, सैनिकी विद्यालयात ऑनलाईन क्लासेस इ. ०६ वी ते १२ वी या वर्गाचे नियमित चालू आहे. आमचे सर्व शिक्षक विद्यालयात येऊन क्लासेस घेतात. कोरोनाच्या या महामारीत देखील आम्ही शिक्षण चालू ठेवले आहे. सर्व विषयांचे दररोज नियमित क्लास आम्ही घेत आहोत.

प्रमुख पाहुण्या केंद्र प्रमुख सौ. प्रतिभा मुळे मॅडम आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या, सैनिकी विद्यालयाचा परिसर पाहून मी भारावून गेले आहे. या विद्यालयास महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार मिळाला आहे हे ऐकुन खूप आनंद वाटला. विद्यालयात शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात, त्यामुळे तुमच्या विद्यालयाचे निकाल चांगले आहेत. सैनिकी विद्यालयात विद्यार्थ्यांना देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,समाजसेवा इ. गुण अंगिकारण्यासाठी शिकविले जाते.तसेच भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे या विद्यालयातून बाहेर पडणारा विद्यार्थी एक चांगला नागरिक बनतो.

अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, या कोरोनाच्या महामारीत देखील आम्ही पालकांशी ऑनलाईन मिटिंगच्या माध्यमातून संपर्क करुन विद्यार्थ्यांना नियमित क्लास करायला लावतो.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अंबिका पारसेवार यांनी केले तर आभार विभाग प्रमुख सीमा मेहत्रे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालाजी कांबळे, सुनील महिंद्रकर, नागेश पंगू यांनी परिश्रम घेतले.

About The Author