एम व्ही पाटील सीबीएसई पब्लिक स्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

एम व्ही पाटील सीबीएसई पब्लिक स्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

उदगीर : एम व्ही पाटील सीबीएसई पब्लिक स्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गणेश हुडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिन बनाळे, कृष्णा वासुदेव हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृष्णा वासुदेव आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य ब्रिटिशांच्या विरोधात लढा देण्यासाठी घातले. त्यामुळे आज आपण स्वातंत्र्यात जीवन जगत आहोत.

अध्यक्षिय समारोपात गणेश हुडे म्हणाले, महात्मा गांधी यांचा जन्मदिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा व शांतता दिन म्हणून साजरा केला जातो. लालबहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते. देशाच्या स्वातंत्र्यात या दोन्ही महापुरुषांनी खूप परिश्रम घेतले आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बनाळे यांनी केले तर आभार माणिकराव अंबेराव यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author