जेष्ठ नागरिक दिनानिमीत्त मोफत शिबीर संपंन्न
लातूर (प्रतिनिधी) : जागतिक जेष्ठ नागरिक दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने ग्रामीण रुग्णालय मुरुड, गायत्री हाॅसपीटल लातुर व महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे जागतिक जेष्ठ नागरिक दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला .या वेळी गायत्री हाॅसपीटल लातुर तर्फे मोफत ह्रदयरोग, दमा, डेंगु, रक्त दाब, मधुमेह, न्युमोनिया, सांधेवात ईत्यादि आजारांवर डाॅ भराटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत निदान व ऊपचार करण्यात आले. या वेळी गायत्री हाॅसपीटल येथील डाॅ अतकुरे, शेळके, श्री सरवदे, कासराळे यांनी सहकार्य केले.या शिबीरामध्ये जवळ १५० रुग्णांची तपासणी करुन ऊपचार करण्यात आले. ज्या रुग्णांना मधुमेह, बीपी, ह्रदयरोग ,पॅराॅलिसीस, न्यमोनिय, डेंगु , दमा असे आजार आढळुन आलेले आहेत त्यांना जीवनदायी योजने अंतर्गत गायत्री हाॅसपीटल लातुर येथे मोफत ऊपचार करण्यात येणार असल्याचे श्वसन विकार व छातीविकार तज्ञ डाॅ रमेश भराटे यांनी नमुद केले. जेष्ठ नागरीकांसाठी मोफत शिबीर घेतल्याबद्दल कौतुक करण्यात येत आहे.