संत ज्ञानेश्वर विद्यालयातील बालसभेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

संत ज्ञानेश्वर विद्यालयातील बालसभेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अहमदपूर (गोविंद काळे) : महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयाने बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. वर्ग पाचवीतील विद्यार्थ्यांनी या बालसभेचे नियोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यार्थी श्रीजल नवलागिरे व प्रमुख पाहुणे श्रुतीताई चंदे, स्नेहाताई बोईनवाड व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरेन गुंडरे व संकल्प वाघमारे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्रेया देवकते यांनी मानले.या बालसभेत पाचव्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी भाषणं केली यात विद्यार्थी आयुष सुरनर, शय्यान शेख, श्रुती चंदे ,आरती वाडकर, श्रीजल नवलागिरे ,संस्कृती स्वामी, प्रतीक्षा भगत ,श्रावणी भंडे, प्रणाली कासले, सुरनर आयुष, राजनंदनी रोडगे, रोहन वट्टमवार, संस्कृती गोरे, ईश्वर मोरे, पायल फुले, अभिजीत ढोले, दिव्या हामने, दिव्या पोले, साक्षी केंद्रे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणं केली. कार्यक्रमासाठी पाचवी वर्गाच्या वर्गशिक्षिका सविता पाटील, मुख्याध्यापिका आशा रोडगे मॅडम सह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका या कार्यक्रमासाठी आँनलाईन उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!