महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व मुर्ती लहान पण कीर्ती महान असणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती अहमदपुर येथील महात्मा गांधीनगर येथे साजरी करण्यात आली. राष्टपिता महात्मा गांधी यांनी देशाला अहिंसेच्या मार्गानी स्वातंत्र मिळवून दिले तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश योग्य चालवण्यासाठी लालबहादूर शास्त्रीनी जय जवान जय किसान हा नारा दिला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव होते तर अहमदपूर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखेचे अध्यक्ष म्हणून डॉ धीरज देशमुख हे होते महात्मा गांधी यांचा जन्मदिवस हा जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.आजपर्यंत महात्मा गांधी यांच्या जीवनावर एक लाखापेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत.जगातील सहाशे विद्यापिठात गांधी विचारांवर अभ्यासक्रम शिकवले जातात असे या प्रसंगी भागवत येनगेसरांनी प्रस्तावनेत सांगितले.या प्रसंगी गांधी नावाचा शुर माणूस व वसा दाभोळकरांचा हे दोन ग्रंथ सर्व उपस्थितांना भेट दिली. महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पूजन अहमदपुर नगरीच्या नगराध्यक्षा सौ.आश्वीनी कासनाळेताई यांनी केल्या तर लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेविका सौ अनुराधा नळेगावकर यांनी केल्या. यावेळी, अभय मिरकले नगरसेवक. हरिदास तन्मेवार .इमरोज पटवेकर, मानेवर, गोंडसर, प्रा रत्नाकर नळेगावकर, चंद्रशेखर भालेराव, शेषराव ससाने. मेघराज गायकवाड, नामदेव राठोड, नीतिन पिचारे , भगवत येणगे, मोसिन चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते, गुटेसरांनी आभार मानले.