सर्वांनी न्यायालयीन कायद्याचा लाभ घ्यावा – जिल्हा न्यायाधीश संभाजीराव ठाकरे यांचे प्रतिपादन

सर्वांनी न्यायालयीन कायद्याचा लाभ घ्यावा - जिल्हा न्यायाधीश संभाजीराव ठाकरे यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : देशातील सर्वसामान्य, नागरिक, गोरगरीब, दीनदलित, पीडित, अन्यायग्रस्त ,अबला यासह समाजातील उपेक्षित घटकांना कायदा समजावा म्हणून कायदेविषयक शिबिर व कायदेविषयक माहिती रॅलीचे आयोजन असल्याचे सांगून सर्वांना सर्व स्तारातील लोकांनी कायद्याचा लाभ घ्यावा कल्याणकारी योजना समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत कायद्याचे ज्ञान पोहोचले पाहिजे या उद्देशाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विधी साक्षरतेच्या शिबिराचा लाभ घ्यावा असे जाहीर आव्हान जिल्हा न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश संभाजीराव ठाकरे यांनी बोलताना व्यक्त केले.

तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कायदेविषयक शिबिर व रॅलीचा समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दिवाणी न्यायाधीश प्रसाद सबदीकर, दिवानी न्यायाधीश आशिष साबळे, दिवानी न्यायाधीश शामराव तोंडचीरे, दिवानी न्यायाधीश अतुल उत्पात, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे ,गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड, वकील संघाचे अध्यक्ष अॅड हेमंत पाटील, सचिव अॅड संतोष दराडे, उपाध्यक्ष ए.बी.डक, सहसचिव रोहिणी देशमुख, ज्येष्ठ विधिज्ञ भगवानराव पौळ, अॅड टि. एन. कांबळे सह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अॅड वीरेश उपे यांचे व दिवाणी न्यायाधीश अतुल उत्पात यांचे आजादी का अमृत महोत्सव या विषयावर मार्गदर्शन पर भाषणे झाली प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन रामलिंग तत्तापुरे यांनी तर आभार अॅड महाजन कांबळे यांनी मानले कायदा विषयक माहिती रॅली सकाळी नऊ वाजता न्यायालय परिसरातून काढण्यात आली यात न्यायाधीश, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, एनसीसीचे विद्यार्थी, एन एस एस चे विद्यार्थी, महिला व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचा शुभारंभ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रीय विधी सेवेच्या गीताने करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विधी सेवा समिती व वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले

About The Author