ओला दुष्काळ जाहीर करण्याची वंचितची मागणी
अहमदपूर (गोविंद काळे) : पंचनामे व ई-पीक पहाणीचे ढोंग बंद करून अहमदपुर तालुक्यासह महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई व विमा देण्यात यांवा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उदीड, कापूस, सह हाताशी आलेली सर्व पीकं उद्धवस्त झाली आहे त्यामुळे सरकारनं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा करणे आवश्यक आहे पण सरकार ई-पीक पहाणी,पिक पंचनाम्यासारखी नाटक करून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे मोबाईल नाहीत तर इ-पिक पहाणी कशी करणार, तसेच झालेल्या नुकसानीची व राहिलेल्या पिकाची काढणी करणार का अर्ज करत बसणार अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारचे लोकप्रतिनिधी,अधीकारी पहाणी करतं आहेत, प्रचलित पद्धतीनुसार मंडळनिहाय नुकसान ठरवुन शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचे आदेशित करावे अशी मागणी वंचित बहूजन आघाडी अहमदपुरच्या वतीने उपविभागीय अधिकारी अहमदपुर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.
अहमदपुर तालुक्यातील शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेली पीकं नष्ट झाली आहेत. त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्याला शासनाकडून तात्काळ मदत मिळणं गरजेचं आहे. सरकारकडून फक्त पंचनाम्याचे आदेश दिले जात आहेत, यापलीकडे काही केलं जात नाही. सरकारने हे ढोंग बंद करून तातडीने नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. पावसामुळे सरकारी ३३% नुकसानीच्या निकषांहून अधिक पिकांचं नुकसान झाले आहे.त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर होणे गरजेचे आहे. ओला दुष्काळा करीता कोरडवाहू शेतीसाठी जवळपास १३ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बागायती शेतीसाठी जवळपास १८ हजार रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई जाहीर होते. ही नुकसानभरपाई अपुरी असून अल्पबाधित शेतकऱ्यांना ५० हजार रुपये आणि जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १ लाख रुपये सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी वंचित बहूजन आघाडी अहमदपुरच्या वतीने करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याचे अध्यक्ष सहदेव व्होनाळे यांच्या सह सारिपुत्र ढवळे, उत्तम गोरे, मंगेश स्वामी, विकास घोटे,रोकडे पांडुरंग, शेकडे यशवंत, सय्यद तबरेज, मौलाना बिलाल, कांबळे भिमराव,बालाजी थिटे, संतोष गायकवाड, कदम अनिल, मंगेश पिलवटे,तुरेवाले गजेंद्र यांच्यसह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत