ब्रह्मा कुमारीज शाखा अहमदपूर शाखेचा ३७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

ब्रह्मा कुमारीज शाखा अहमदपूर शाखेचा ३७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री जयंती तसेच ब्रह्मा कुमारीज अहमदपूर शाखेचा ३७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी राजयोगिनी ब्र. कु. महानंदा दीदी तर प्रमुख पाहुणे नगराध्यक्षा आश्विनीताई कासनाळे, पोलिस उप निरीक्षक एकनाथ डक,डाँ सुनिता शिंदे, सुनंदा कुलकर्णी, ऊर्जा ऑडिटर केदार खमितकर, ब्र.कु.छाया दीदी यांची उपस्थिती होती. यावेळी ब्र. कु. महानंदा दीदी यांनी शालेय शिक्षण व व्यावहारिक जीवनात आध्यात्मिक मूल्याचे महत्व याविषयांवरती मनोगत व्यक्त केले. ब्रह्मा कुमारीस विद्यालयाचे ‘सेव्ह मिलियन युनिट ऑफ पॉवर प्रोजेक्ट’ चे विमोचन करून जनजागृतीद्वारे १० लाख यूनिट बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ऊर्जा राष्ट्राची संपत्ती असून आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी ऊर्जेची बचत करावे असे प्रतिपादन केदार खमितकर यांनी केले. आपण सर्वांनी मिळून अध्यात्माच्या माध्यमातून प्रत्येकाने एक युनिट ऊर्जेची बचत केली तर राष्ट्राची दोन युनिटची बचत होणार असल्याचे सांगितले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक ब्र.कु.छाया दीदी तर पाहुण्यांचा तिलक व पुष्पगुछ देऊन ब्र. कु.मीरा दीदी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आभार जितेंद्र कोहाळे यांनी मानले. यावेळी उपस्थित नागरिकांनी शासनाच्या -१९ नियमांचे पालन करून मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

About The Author

error: Content is protected !!