गटशिक्षणाधिकारी नितीन लोहकरे साहेबांची श्यामलाल हायस्कूल ला सदिच्छा भेट !
उदगीर : येथील श्यामलाल हायस्कूल ला उदगीरचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी नितीन लोहकरे साहेबांनी सदिच्छा भेट दिली. इयत्ता आठवी व पुढील वर्ग शाळा उघडण्याचा 4 ऑक्टोबर हा पहिला दिवस त्यानिमित्ताने माननीय गटशिक्षणाधिकारी लोहकरे साहेब यांनी शाळेची पाहणी केली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला, कसलीही भीती, तणाव न बाळगता आनंददायी वातावरणामध्ये covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करून, नेमवून दिलेल्या वेळापत्रक व नियोजनाप्रमाणे शहरी भागातील इयत्ता आठवी पासून पुढील वर्गातील विद्यार्थ्यांनी पालकांच्या संमतीसह शाळेत यावे यासंबंधी महत्त्वपूर्ण सूचना व मार्गदर्शन केले तसेच माननीय गट शिक्षणाधिकारी लोहकरे साहेब, केंद्रप्रमुख श्री धमनसुरे सर, श्री पेद्दावाड सर यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे पुरविण्यात आलेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शाळा सदिच्छा भेट व पाहणीसाठी आलेल्या गटशिक्षणाधिकारी साहेबांचे श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री आनंद चोबळे सर यांनी शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला. केंद्रप्रमुख श्री धमनसुरे सर यांचा सत्कार श्री बस्वराज बिरादार सर यांनी केला तर श्री पेद्दावाड सरांचा सत्कार श्री बालाजी चव्हाण सरांनी केला. ज्येष्ठ पत्रकार राम मोतीपवळे यांचा सत्कार उमाकांत सूर्यवंशी यांनी केला तसेच शाळा उघडण्याचा पहिला दिवस या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत मुख्याध्यापक श्री आनंद चोबळे सर व शिक्षक,शिक्षिकांनी केला. त्याचबरोबर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री देबडवार संजय सर यांचाही सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन शाळेच्या वतीने मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.