भ्रष्ट राजकारणाचा वारसा नसलेला पक्ष म्हणजे मनसे – संजय राठोड

भ्रष्ट राजकारणाचा वारसा नसलेला पक्ष म्हणजे मनसे - संजय राठोड

उदगीर : सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संपूर्ण मराठवाड्यात मनसे नेते दिलीप बापू धोत्रे , प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात “गाव तिथे शाखा””घर तेथे कार्यकर्ता” अभियान सुरू केले असून त्याअंतर्गत उदगीर तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने कामास लागले आहेत. ग्रामीण भागात मनसेला उदंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. या अभियाना अंतर्गत मोरतळवाडी (नळगीर)येथे शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी झालेल्या सभेत उपजिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी आपले मत व्यक्त करताना मनसे हा भ्रष्ट राजकारणाचा वारसा नसलेला पक्ष असून  राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करत असताना इतर पक्षातील आजी-माजी आमदार खासदारांना किंवा भ्रष्ट राजकारणाचा वारसा असणाऱ्या प्रस्थापितांना आपल्या पक्षात घेऊन पक्ष स्थापन केला नसून मनात आणले तर ते तसे करू शकले असते, पण मनसेमध्ये भ्रष्ट राजकारणाचा वारसा असलेले लोक नको म्हणून राज साहेबांनी सर्व सामाजाच्या,दीनदलितांच्या,शेतकऱ्याच्या,कष्टकऱ्यांच्या घरातील तरुणांना घेऊन मनसे ची स्थापना केली, आणि असेच तरुण महाराष्ट्राचे नवनिर्माण घडवु शकतात हा विश्वास बाळगला आहे. असेही राठोड यांनी सांगितले.

या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे ,तालुका उपाध्यक्ष संग्राम केंद्रे,शहराध्यक्ष अभय सूर्यवंशी,शहर उपाध्यक्ष श्रीकांत बिरादार,व्यापारी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय देबडवार,रामेश्वर बनशेळकीकर,शिवराज ढोले,आकाश कांबळे,संजीव केंद्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मोर्तळवाडी (नळगीर)शाखेचे शाखाध्यक्ष परमेश्वर भोसले, उपाध्यक्ष राम वाघमारे, सचिव हरिकिषण भोसले,  संपर्कप्रमुख कृष्णा कोठारे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे, सहसचिव अविनाश भोसले, सहकोषाध्यक्ष संभाजी आमलपुरे सह अनेक सदस्यांची शाखा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

About The Author