लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – सुकणीकर

लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा - सुकणीकर

उदगीर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टी मध्ये शेतिचे मोठे नुकसान झाले आहे.त्यांना तातडीने आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे.

 या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. पंडितराव सुकणीकर यांनी महसूल प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकासोबत जमिनीही खरवडून गेल्या आहेत. त्यामुळे पिका सोबतच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामाचे नाटक न करता सरसगट अर्थसहाय्य करावे. अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडितराव सुकणीकर यांनी केली आहे.

About The Author

error: Content is protected !!