अहमदपूर शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलका फुलका योग कार्यक्रम संपन्न
अहमदपूर ( गोविंद काळे ) : दि.१. ऑक्टो रोजी अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी “हलका फुलका योग” हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास आदरणीय छाया बहनजी, योगाचार्या सौ कलावती भातांब्रे, योगाचार्य श्री शिवमूर्ती भातांब्रे, योगाचार्या सौ प्रेमा वतनी व योगरत्न डाॕ. मेजर मधुसूदन चेरेकर यांनी मार्गदर्शन केले. यात रुग्णांचे नातेवाईक व इतर वरिष्ठ नागरिकांनी योगाचे प्रशिक्षण घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वैद्यकीय अधिक्षक डाॕ दत्तात्रय बिराजदार, डाॕ प्रवीण भोसले, अनिकेत काशीकर व श्री वामन चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.