महात्मा फुले महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दूसरे पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.तसेच ‘आझादी का अमृत महोत्सव ‘निमित्त अहमदपूर शहरातून रॅली काढण्यात आली. या बाबातचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. नागराज मुळे हे होते तर ह.भ.प.प्रा. डॉ. अनिल मुंढे व डॉ. सतीश ससाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अहमदपूर विधी समिती व महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने अहमदपूर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कार्यलयीन कर्मचारी कोविड – १९ चे नियम पाळून उपस्थित होते.