‘संगांयो’ लातूर ग्रामीणचे लोकाभिमुख ऊपक्रम कौतुकास्पद – आमदार धिरज देशमुख

'संगांयो' लातूर ग्रामीणचे लोकाभिमुख ऊपक्रम कौतुकास्पद - आमदार धिरज देशमुख

बोकनगाव येथे आमदारांच्या हस्ते निराधारांना घरपोच मंजुरी पत्र वाटपाचा शुभारंभ

लातूर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील कोणताही निराधार शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी लातूर ग्रामीणच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीने गावोगावी भेटी देऊन अनेक लोकाभिमुख, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून निराधारांना आधार देण्याचे काम केले. महाविकास आघाडी सरकारचीही हीच भूमिका आहे. संगांयो समितीचे कार्य असेच अग्रेसर व दिशादर्शक राहावे, असे कौतुकास्पद उद्गार लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले.

लातूर तालुक्यातील बोकनगाव येथे ग्रामीणच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या वतीने निराधारांना योजनेचे मंजुरी पत्र देण्याचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी आमदार धिरज देशमुख बोलत होते. याप्रसंगी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे,लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख,संगांयो समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील,पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश उफाडे, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, गटविकास अधिकारी शाम गोडभरले, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, प्रताप पाटील, मांजरा साखर चे संचालक धनराज दाताळ, पंचायत समितीचे माजी सभापती जितेंद्र स्वामी, संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे सदस्य हरीश बोळंगे,सचिन दाताळ,नायब तहसीलदार राजेश जाधव, नायब तहसीलदार श्रावण उगीले, नायब तहसीलदार रत्नाकर महामुनी, नायब तहसीलदार सुधीर देशमुख, महसूल मंडळ अधिकारी संजय घाडगे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी योगिता अारदवाड, तलाठी बी व्ही सुडे, बोकनगावचे चेअरमन मधुकर दाताळ, सरपंच सौ.रंजना स्वामी,उपसरपंच किशोर दाताळ ,जब्बार सगरे, सरवर शेख, कमलाकर अनंतवाड, बालाजी वाघमारे, ज्ञानेश्वर दाताळ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार धिरज देशमुख म्हणाले, लातूर ग्रामीणच्या संगांयो समितीने अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवून,शासनाची योजना निराधारांच्या घरापर्यंत पोचवली. निराधारांना आधार देण्याचा शासनाचा उद्देश समिती आपल्या कार्याच्या माध्यमातून सफल करीत आहे. समिती असेच अग्रेसर राहून अधिकाधिक लोकहिताचे कार्य यापुढेही करेल हा ठाम विश्वास आहे. समितीच्या वतीने निराधार वंचितांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे काम समाधान देणारे आहे. महाविकास आघाडी सरकार हे शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे, हेच काम या योजनेच्या माध्यमातून होत आहे, असेही आमदार धिरज देशमुख यांनी सांगितले.

यावेळी संगायोचे चेअरमन प्रविण पाटील यांनी संगांयो-इंगांयोची अर्जप्रक्रिया पारदर्शक, प्रभावी व लोकाभिमुख पद्धतीने राबविण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री ना अमितजी देशमुख, लातूर ग्रामीण चे आमदार धिरजजी विलासरावजी देशमुख यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे सांगून संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती तालुका लातूर ग्रामीणचे सदस्य सर्वश्री अमोल देडे, सौ शितल राजकुमार सुरवसे, धनंजय वैद्य, हरीश बोळंगे, संजय चव्हाण, अमोल भिसे, परमेश्वर पवार, रमेश पाटील, आकाश कणसे व संबंधित गावातील संजय गांधी योजना समन्वयक यांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना घरपोच मंजुरी पत्राचे वाटप करणार असुन यापुढेही गावस्तरावरच निराधारांना आधार देण्यासाठी समिती कटिबद्ध असल्याचे सांगितले.

About The Author