औराद येथे पुराच्या पाण्यात म्हैस दगावली

औराद येथे पुराच्या पाण्यात म्हैस दगावली

औराद शहा (भगवान जाधव) : येथील मांजरा आणी तेरणा नदीला पुर आल्याने येथील अल्पभूधारक शेतकरी जैनोद्दीन महताब देवनाळे यांच्या शेतात बांधलेली म्हैस ही अंदाजे ऐंशी हजार रुपये किंमतीची पुराच्या पाण्यात बांधलेला कासरा झुडपाला अडकल्याने म्हैस पुराच्या पाण्यात बुडुन दगावली आहे. जैनोद्दीन महताब देवनाळे यांची शेती मांजरा नदी काठी असल्याने रात्रीतुन नदीला पुर आल्यामुळे त्यांची शेतात बांधलेली म्हैस मेक उपटुन घेऊन पाहत जिव वाचविण्यासाठी धडपड केली पण तिच्या सोबत बांधलेला कासरा व मेक असल्याने ते शेतातील झुडपाला कासरा अडकल्यामुळे अखेर अंदाजे ऐंशी हजार रुपये किंमतीची म्हैस पाण्यात बुडाली व चिखलात फसुन तिचा म्रुत्यु झाल्याचे पाणी उतरल्यानंतर दिसुन आले. नंतर ही घटना त्यांनी तलाठी भोसले व पशुधन विकास अधिकारी डॉ. चव्हाण यांना कळविल्यानंतर म्हशीचे शवविच्छेदन करण्यात आले व तलाठी यांचा पंचनामा करणे सुरु असल्याचे सांगितले.

About The Author

error: Content is protected !!