हिवरा(संगम)येथे लाखोंच्या रोकडची धाडसी चोरी

हिवरा(संगम)येथे लाखोंच्या रोकडची धाडसी चोरी

महागाव (प्रतिनिधी): घरी कोणीच नसल्याचे पाहुन चोरट्यांनी बंद घरातील साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला असल्याची घटना मंगळवारी सकाळी 10 वाजता उघडकीस आली.महागाव तालुक्यातील हिवरा(संगम)येथील सेवानिवृत्त शिक्षक रवींद्र कोंडोलीकर हे आपल्या परिवारासह बाहेरगावी गेले होते हीच संधी साधत चोरट्यांनी बंद घरात प्रवेश करून कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा रोख साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला ही घटना आज सकाळी साडे आठ वाजताच्या दरम्यान उघडकीस आल्यानंतर रवींद्र कोंडोलीकर यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी महागाव पोलीस स्टेशन गाठून चोरीची माहिती दिली महागाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा करून ठसेतज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले होते.या घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिलखेलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. कोंडोलीकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात भादवी १८६०,कलम४५७,३८०नुसार गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास महागाव पोलीस स्टेशन चे निरीक्षक विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरीक्षक राहुल वानखेडे,बिट जमादार रुपेश चव्हाण करीत आहेत.

About The Author