गुंठेवारी विकास समिती लातूर जिल्हाध्यक्ष पदी साजिद पटेल यांची निवड
लातूर (प्रतिनिधी) : शिवसेना प्रणित गुंठेवारी विकास समितीच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी साजिद नजीर पटेल यांची निवड राज्याचे अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनी आज जाहीर केली. यावेळी पटेल यांना चंदनदादा चव्हाण यांनी शिवबंधन बांधून स्वागत केले.तसेच लातूर शिवसेना प्रमुख मा शिवाजीराव माने यांनी त्यांना भ्रमणध्वनी वरून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई नुकतीच गुंठेवारी विकास समिती ची घोषणा करण्यात आली या समितीच्या राज्याचे अध्यक्षपदी सांगलीचे चंदन दादा चव्हाण यांची निवड झाल्यानंतर चव्हाण यांनी संपूर्ण राज्यभर गुंठेवारी विकास समितीचे बांधणी वेगानं सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष पदी आज साजिद पटेल यांची निवड जाहीर केली पटेल हे लवकरच लातूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करणार आहेत याप्रसंगी बोलताना चव्हाण म्हणाले राज्यातील गुंठेवारी विकास संदर्भात राज्य सरकारने जे काही निर्णय घेतले आहेत ते सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी आणि त्यातून गुंठेवारी संदर्भातील काही प्रश्न असतील ते तातडीने सोडविण्याचे काम ही समिती करेल या समितीच्या जिल्हा अध्यक्षपदी साजिद पटेल यांची निवड करताना त्यांनी सर्वसामान्यांना द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लातूर जिल्ह्यात गुंठेवारी विकास समितीचे काम सर्व पदाधिकार्यांना विश्वासात घेऊन प्रभावीपणे करण्याची ग्वाही दिली. यावेळी राज्याचे उपप्रमुख बाबासाहेब सपकाळ,मुबारक शेख यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते.