पार्कींगच्या दंडवसूलीबाबत मनपा फेरविचार करणार
युवा मोर्च्याचा पाठपुरावा; मनपा आयुक्तांचे शिष्ठमंडळाला आश्वासन
लातूर (प्रतिनिधी) : मनपाकडून नो पार्किंगच्या नावाखाली शहरातील टोईंगचे कंत्रात घेतलेल्या व्यक्तीकडून अव्वाच्यासव्वा दंडाची वसूली केली जात आहे. पार्कींगची कसलीही व्यवस्था नसताना मनपाकडून केली जाणारी दंडवसूली बेकायदेशीर असून ती तात्काळ थांबविण्यात यावी. तसेच वसूली करणार्या कर्मचार्यांची भाषा बदलण्यासाठी भाजपायुमो शहरच्यावतीने युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्त्वाखाली मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. याची तात्काळ दखल घेवून मनपाने पार्कींगच्या नावावर सुरू असलेल्या दंडवसूलीबाबत मनपा फेरविचार करणार असल्याचे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिलेले आहे. त्यामुळे शहरातील वाहनधारक नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली मनपाच्या टोईंगवाल्याकडून सक्तीने दंडात्मक वसूली केली जात आहे. मुळात शहरातील मुख्य रस्त्यावर पार्कींगसाठी म्हणावी तशी जागा नाही, रस्त्यावर कोठे वाहन सोडावे. याबाबतचे फलक लावलेले नाहीत, रस्त्याच्या कडेला, पट्टेही मारलेले नाहीत, मल्टीस्टोअरेज पार्कींगची कसलीही सुविधा नसताना वाहनधारकांनी आपली वाहने कोठे लावावी. याची माहिती पालिकेकडून दिली जात नाही. असे असतानाही पालिकेने पार्कींग आणि दंडवसूलीसाठी ठेकेदाराची नेमणूक केलेली आहे आणि संबंधीत ठेकेदारही वाहनधारकांची सर्रास लूट करीत आहे. रस्त्याच्या कडेला वाहन उभे असेल तरीही त्याच्याकडून सक्तीने दंड घेतला जात आहे. त्यांनी लावलेला दंड नागरिक भरण्यास तयार असतानाही सदरील कर्मचार्याकडून वाहनधारक नागरिकांना अपमानास्पद भाषा वापरली जात आहे. असा अनुभव शहरातील प्रत्येक वाहनधारकांना येत आहे. त्यामुळे ही अवैध वसूली थांबवावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्त्वाखाली मनपा आयुक्तांना देण्यात आले.
या निवेदनावर भाजपा युवा मोर्च्याचे सरचिटणीस अॅड.गणेश गोजमगुंडे, उपाध्यक्ष राहूल भूतडा, अॅड.पंकज देशपांडे, सचिन कांबळे, हरिकेश पांचाळ, प्रतिक बेरकिले, चिटणीस व्यंकटेश हांगरगे, संतोष तिवारी, भाजपा युवा मोर्चा युवती अध्यक्ष पूनम पांचाळ, विद्यार्थी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष गोविंद सुर्यवंशी, मंडलाध्यक्ष प्रेम मोहिते, काका चौगुले, राजेश पवार, गणेश श्रीमंगले, कार्यालय प्रमुख आकाश बजाज, विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष चैतन्य फिस्के, मंदार कुलकर्णी, नहुश पाटील, युवा वॉरियर्सचे अध्यक्ष आकाश पिटले, यशवंत कदम, अक्षय शिंदे, योगेश गंगणे, ओम राठोड, संकेत गवळी, राहूल आशय यांच्यासह भाजपा युवा मोर्च्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पार्कींगची सुविधा होईपर्यंत दंडवसूली नाही !!
युवा मोर्च्याच्या या पाठपुराव्यामुळे मनपा आयुक्तांनी पार्कींगच्या दंडवसूलीबाबत फेरविचार करणार असल्याचे उपस्थित शिष्ठमंडळास सांगितले. तसेच शहरात पार्कींगची सुविधा उपलब्ध होईपर्यंत दंडवसूल केला जाणार नाही. असे सांगून जे कर्मचारी वाहनधारक नागरिकांना अपमानास्पद भाषा वापरतात त्यांना समज देण्याचेही आश्वासन उपस्थित शिष्ठमंडळाला आयुक्तांनी दिले.