पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे महिलानी पोस्टकार्डातून मानले आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे महिलानी पोस्टकार्डातून मानले आभार

यवतमाळ (राम जाधव) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजूंना धान्य वाटप, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संपर्क अशा विविध उपक्रमांनी भारतीय जनता पार्टीच्या सेवा व समर्पण अभियानाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यात प्रारंभ करण्यात आला होता . त्याच अनुषंगाने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी साहेब यांच्या वाढदिवसानिमित तालुका महागाव येथील भारतीय जनता महिला मोर्चाच्यावतीने अभियान राबविण्यात आले.

या अभियानात विविध प्रकारचे उपक्रम राबविले असून देशाचेदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजूंना धान्य वाटप, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संपर्क अशा विविध उपक्रमांनी भारतीय जनता पार्टीच्या सेवा व समर्पण अभियानाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यात प्रारंभ करण्यात आला होता . त्याच अनुषंगाने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी साहेब यांच्या वाढदिवसानिमित तालुका महागाव येथील भारतीय जनता महिला मोर्चाच्यावतीने अभियान राबविण्यात आले.

माननीय पंतप्रधान यांच्या विकास योजनेतील लाभार्थी महिला यांनी अभिनंदन पोस्टकार्ड लाभार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना पाठवले व सर्व महिलांनी त्यांचे आभार मानले असून पंतप्रधान घरकुलाचे लाभ, शौचालय बांधण्यासाठी योजना आणली. शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान पेन्शन योजना चालू केली. कोरोना महामारीच्या काळात स्वस्त धान्य मोफत दिले अशा तसेच महिलांसाठी अनेक योजनाचा आधार गरीब महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाला असून मोदीजीचे भाजपा महिला मोर्चा महागाव आघाडीच्या वतीने पोस्ट कार्ड पाठवून आभार मानले. यावेळी भाजपच्या महिला नेत्या जिल्हा उपाध्यक्ष सौ छाया खंदारे, भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा तथा तीवरंगच्या सरपंचा सौ जयश्री सुनील राठोड,प्रिया शिंदे, आशा साबळे, सुनीता गुंफा,तुळसा चव्हाण, कांता जाधव, लीला जाधव, सिंधू जाधव, यशोदाबाई सावळे, सीता सोळंके इत्यादी सह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author