महाराष्ट्र राज्य कामगार विकास संघटनेच्या वतीने निखिल गायकवाड यांना गौरव पुरस्कार!

महाराष्ट्र राज्य कामगार विकास संघटनेच्या वतीने निखिल गायकवाड यांना गौरव पुरस्कार!

लातूर (प्रतिनिधी) : निखिल शिवाजी गायकवाड हे उदयोन्मुख राजकीय व्यक्तिमतत्व, घरातून समाजकार्य करण्याचा वसा घेऊन राजकारणात सक्रिय असलेले निखिल शिवाजी गायकवाड.

कोरोना महामारीच्या महाभयंकर संकटात सापडलेल्या नागरिकांचे हाल न पाहवून रमाई अन्नसेवा ग्रुपच्या माध्यमातून निखिल गायकवाड आणि त्यांच्या सहकार्यानी हातावर पोट असलेल्या, कोरोना झालेले रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांच्यासाठी मोफत अन्नदान करण्याचे ठरवले. ‘ इच्छा तिथे मार्ग ‘ या न्यायाने या ग्रूपने धान्य आणणे, अन्न बनवून डबे गरजू पर्यंत पोचवणे धान्याचे किट असे सारे सुरु केले. दररोज ५०० हून अधिक डब्बे गरजू पर्यंत पोचविण्याचे कार्य केले. मोफत अन्नदान, भाजी पाल्याचे वाटप, मास्क चे वाटप बघता बघता हे कार्य असे वाढत गेले. या कार्याने गरजूंना मदत मिळाली इतरांना प्रेरणा मिळाली.

निखिल शिवाजी गायकवाड हे कृतिशील नेते आहेत, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपल्या कृतीद्वारे हा वारसा जतन करण्यासाठी त्यांची चाललेली धडपड निश्चितच उल्लेखनीय आहे. अशा कोरोना काळात माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या रमाई अन्नसेवा या संस्थेस आणि निखिल शिवाजी गायकवाड यांस महाराष्ट्र राज्य कामगार विकास संघटनेच्या वतीने लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्या शुभहस्ते गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. निखिल गायकवाड यांचे अव्याहत चाललेले समाजकार्य म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या वर्तमानाचे सोनेरी पान होय! त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या लातूर शहर, जिल्हा चिटणीस पदी त्यांची नियुक्तीही झाली आहे. रमाई अन्नसेवेच्या माध्यमातून निखिल शिवाजी गायकवाड यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे तसेच रमाई अन्नसेवा ग्रूपचे विशाल कोथिंबिरे,बाबा कांबळे, ऋषी जाधव, केदार कोथिंबिरे यांचे सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे .

About The Author