दयानंद कला च्या अश्विनी गायकवाड ची पदव्युत्तर शिक्षणासाठी आय.आयटी हैद्राबाद येथे निवड

दयानंद कला च्या अश्विनी गायकवाड ची पदव्युत्तर शिक्षणासाठी आय.आयटी हैद्राबाद येथे निवड

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्था,लातूर संचलित दयानंद कला महाविद्यालयल,लातूर बी.ए. या पारंपारिक पदवी अभ्यासक्रमाबरोबरच कांही रोजगाराभिमुख पदवी अभ्यासक्रम शिकवले जातात त्या मध्ये बी.ए.फॅशन, बी.ए.ॲनिमेशन व बी.ए.प्रशासकीय सेवा यांचा सामावेश आहे. बी.ए. फॅशन या पदवी अभ्यासक्रमातून नुकतेच बी.ए.पदवीचे शिक्षण पूर्ण झालेल्या अश्विनी गायकवाड हिचा पदव्युत्तर शिक्षणासाठी आय.आयटी हैद्राबाद येथील राष्ट्रीय फॅशन प्रोद्योगिक संस्था येथे निवड झाली आहे. तिने दयानंद कला महाविद्यालयात फॅशन डिझाईन मध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिच्या या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष श्री. अरविंद सोनवणे , ललितभाई शाह, रमेशकुमार राठी, सचिव श्री. रमेश बियाणी, संयुक्त सचिव श्री. सुरेश जैन कोषाध्यक्ष श्री. संजय बोरा, प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड तसेच फॅशन विभागप्रमुख प्रा.सुवर्णा लवंद व विभागातील अन्य प्राध्यापकांनी अभिनंदन केले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!