उदयगिरी लाॅयन्स नेत्ररूग्नालय येथे मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबीर संपन्न

उदयगिरी लाॅयन्स नेत्ररूग्नालय येथे मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबीर संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : उदयगीरी लाॅयन्स नेत्ररूग्नालय येथे महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती सेवा सप्ताह निमित्त उदयगीरी लाॅयन्स नेत्ररूग्नालय लॉयन्स क्लब, लॉयन्स क्लब सनरायझर्स व मधुर डायबिटीज सुपर स्पेशालिटी सेंटर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत मधुमेह रोग तपासणी व महिला साठी आरोग्य तपासणी दि. 8 ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदयगीरी लाॅयन्स नेत्ररूग्नालय उदगीरचे अध्यक्ष डाॅ. रामप्रसाद लखोटीया हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मधुमेह तज्ञ डॉ. प्रशांत नवट्टके, डॉ. भाग्यश्री घाळे हे उपस्थित होते. तर मंचावर लॉयन क्लब सनरायझर्सचे अध्यक्ष योगेश चिद्रेवार, विवेक जैन, सुरेश देबडवार, जेष्ट नागरीक बलसुरकरसर, सदाशिश सर, एस.एस.पाटील, गणेश मुंडे, सुदर्शन घंटेवाड, नवीन, केशव बिरादार हे उपस्थीत होते. या शिबीरात 110 नागरिक व कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.एस.एस.पाटील यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!