मदन पाटील यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील बनशेळकी येथील् जिल्हा परिषद शाळाचे मुख्याध्यापक व कासराळ या गावचे सुपुत्र मदन मनोहर
पाटील यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. ०२ ऑक्टोबर २०२१ रोजी पंचायत समिती, उदगीर तर्फे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण भागिरथी मंगल कार्यालय, उदगीर येथे करण्यात आले होते.
यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज म. पाटील नागराळकर, पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, माजी जिल्हा परिषद लातूरचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके व इतर मान्यवर उपस्थित होते.
पाटील यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा परिषद सदयस नागेश्वर पाटील, प.स.सभापती प्रा.शिवाजीराव मूळे,
बनशेळकी सरपंच सौ.ललीता भेदे,
उपसरपंच लक्षमण मानकरे,शिवलींग भेदे,शालेय समितीचे अध्यक्ष अंकुश मानकरे, चेअरमन प्रल्हाद महाजन,तटांमुकत समितीचे अध्यक्ष आन्नासाहेब बनसेळकीकर,माजी अध्यक्ष रोहिदास लोहारे,जगदीश वायगावकर,मलंग सर, यांच्यासह शिक्षक वर्गाने अभीनंदन केले आहे.