श्यामलाल हायस्कूलमध्ये ‘मिशन कवचकुंडल’ covid-19 लसीकरण जाणीव जागृती अभियान संपन्न !

श्यामलाल हायस्कूलमध्ये 'मिशन कवचकुंडल' covid-19 लसीकरण जाणीव जागृती अभियान संपन्न !

उदगीर : येथील श्यामलाल हायस्कूलमध्ये “मिशन कवच-कुंडल” अंतर्गत covid-19 प्रतिबंधक लसीकरण जाणीव जागृती अभियान संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्यामलाल हायस्कूलमधील चित्रकला विभाग प्रमुख,प्रसिद्ध चित्रकार श्री बालाजी चव्हाण सर यांनी भूषविले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक पालक संघाच्या श्रीमती रेखा लाला उपस्थित होत्या.


covid-19 लसीकरणासाठी महाराष्ट्र शासन व अन्य शासकीय यंत्रणांच्या वतीने उदगीर शहरात दिनांक 08ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये मिशन कवच-कुंडल सप्ताह राबविण्यात येत आहे त्यानिमित्ताने पालकांमध्ये लसीकरणा संदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करून लसीकरण जाणीव-जागृती संदर्भात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मिशन कवच-कुंडल अंतर्गत या पालक मेळाव्यास श्री उमाकांत सूर्यवंशी यांनी कोविड लसीकरणा संदर्भात मार्गदर्शन केले. दिनांक 08ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अठरा वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी शासन स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत तेव्हा आपण सर्वांनी या लसीकरण जाणीव जागृती मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा व आपल्या परिसरातील अठरा वर्षापुढील नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे यासंबंधी मार्गदर्शन केले तसेच श्री प्रवीण भोळे सर यांनीही कवच कुंडल मोहिमेअंतर्गत लसीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी अठरा वर्षा पुढील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, शहरात ठिकठिकाणी लसीकरण केंद्र उपलब्ध करण्यात आले आहेत त्याचा लाभ नियमाप्रमाणे सर्व नागरिकांनी घ्यावा व आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे यासंबंधी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास श्री शेख सईद सर, श्री बारोळे सर, मलकापुरे सर, श्रीमती कालिंदी जाधव मॅडम, श्रीमती रणमले मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार श्री हाके नामदेव सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

About The Author