श्यामार्य कन्या विद्यालयात गुणवत्ता विकास मार्गदर्शन बैठक संपन्न

श्यामार्य कन्या विद्यालयात गुणवत्ता विकास मार्गदर्शन बैठक संपन्न

उदगीर ( प्रतिनिधी ) : श्यामार्य  कन्या विद्यालयात शिक्षण विभाची  उदगीर शहरातील मराठी माध्यमाच्या माध्यमिक विभागातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी नितीनजी लोहकरे  होते.  केंद्रप्रमुख बालाजी धमनसुरे, केंद्रप्रमुख श्रीमती प्रतिभा मुळे आणि आयोजक शामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्ञाते तृप्ती उपस्थित होते. श्यामार्य कन्या विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे शाल ,श्रीफळ व ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती देशमुख संगीता व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोबत स्वागत गीत गायन करण्यात आले.

        कोव्हीड-19  मुळे मार्च   2020 पासून प्रत्यक्ष शाळा बंद करण्यात आल्या होत्या. पण या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ई-लर्निंग द्वारे अध्यापन करण्यात आले. श्यामार्य कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध उपक्रम व नवोपक्रम राबवले जातात. शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात शाळा आणि शिक्षक आणि काय करण्याची गरज आहे याबद्दल राज्याच्या टास्क फोर्सने आवाहन केले आहे . या अहवानाप्रमाणे  आणि  संस्थेच्या  सततच्या मार्गदर्शनानुसारआमच्या शाळेत सर्व नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. असे प्रास्ताविक मधून शामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्ञाते यांनी आपले  मत  व्यक्त केले.

           उदगीर शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जावे या हेतूने आपण पूर्वतयारी करणे   आवश्यक आहे. आपल्या देशात शिक्षणाबददल जितके चिंतन होण्याची गरज आहे. शिक्षकांच्या समोर विद्यार्थ्यांना शाळेशी जोडणे आणि गुणवत्ता राखणे यासाठीचे आव्हान कसे पेलणार हा प्रश्न आहे.त्यामुळे गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व शाळांनी आपआपल्या स्तरावर एक   गुणवत्ता   विकास आराखडा तयार करावा, आणि त्याची अंमलबजावणी करावी.  असे अध्यक्षीय समारोपात  गटशिक्षणाधिकारी नितीनजी  लोहकरे यांनी आपले मत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आनंद हुरदळे आणि आभार राहुल गुरमे यांनी व्यक्त केले.

About The Author