जिल्हा बँकेत सर्वांना सोबत घेवून समन्वयाने कार्य केले – दिलीपराव देशमुख
उदगीर मतदार संघातून लक्ष्मीताई भोसले तर जळकोट मधून मारोती पांडे यांची उमेदवारी जाहीर
उदगीर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मागच्या 25 वर्षात शेतकरयांना मदत करण्याच्या दृष्टीने मोठी भूमिका बजावली असून त्यामूळेच जिल्ह्याच्या 500 विविध कार्यकारी सोसायटी ज्या 1 लाख रुपये कर्ज वाटप करत होत्या त्या आज एक कोटी पेक्षा अधिक कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्याचे काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे हे करीत असताना कधीही वसुलीसाठी जप्ती न करता बँक पुनर्वस नातून बाहेर काढून आज राज्यात नव्हे तर देशात लातूर बँक पहिली ठरली आहे असे सांगून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी येणाऱ्या निवडणुकीत बँक बु डवण्याचा अनुभव असणारे लोक येणार असल्याचे बोलले जात आहे त्यासाठी त्यांना रोखा आपण उभे केलेल्या कल्पवृक्षाला द्रिस्ट लागणार याची खबरदारी घ्यावी असे सांगून उदगीर व जळकोट मतदार संघातील दोन्ही उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले ते रविवारी उदगीर येथील भोसले कॉम्प्लेक्स येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक 2021 अनुषंगाने उदगीर व जळकोट तालुक्यातील सोसायटीचे चेअरमन मतदार यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते याच वेळी त्यांनी उदगीर मधून लक्ष्मीताई भोसले तर जळकोट येथून मारोती पांडे यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनल ची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
संवाद मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी आमदार अँड त्रिंबक भिसे राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे , प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजेश्वर निटूरे, काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील, उपसभापति रामराव बिरादार, जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, लक्ष्मीबाई भोसले, प्रीती भोसले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे, बँकेचे संचालक संभाजी सुळ, एन आर पाटील, सौ स्वयं प्रभा पाटील, संभाजी रेड्डी, दिलीप पाटील नागराळकर, सोपान ढगे, हरीराम कुलकर्णी उपसभापती मारलापल्ले, चांदपाशा इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वप्न बघा साकार करण्याची जबाबदारी आमची
यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की गेल्या 35 वर्षात जिल्हा बँकेने अनेक धाडसी निर्णय घेत शेतकरी सभासद ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक विकास करण्यासाठी मदत केली आहे यापुढे ग्रामीण भागातील लोकांनी स्वप्न तुम्ही बघा स्वप्नपूर्ती करायचे काम मी करतो तुम्ही शिक्षण घ्या डॉक्टर इंजिनीयर जिल्हाधिकारी व्हा आम्हाला सांगा काळजी करून तुम्हाला मदत करण्याची भूमिका बजावली आहे यापुढेही बजावू असा शब्द त्यांनी दिला.
राज्यात लातूर जिल्हा बँकेची अभिमान वाटावी अशी वाटचाल – राज्यमंत्री संजय बनसोडे
यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल ठेवली असून त्याचा मला अभिमान वाटतो असे सांगुन आम्हाला घडविण्यात व ईथे जो मी उभा आहे त्यात सर्वात मोठे योगदान दिलीपराव देशमुख साहेब यांचे राहीले आहे हे मी विसरू शकत नाही मागच्या काळात माझ्याकडून काही नजरचुकीने चुका झाल्या असतील पण यापुढे चुकीचं कुठलेही माझ्या हातून काम होणारं नाही याची मी काळजी घेतो अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली
यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजेश्वर निटूरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, सोपान ढगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मंजूर पठाण, रामेश्वर बिरादार, जाधव, उदगीर, जळकोट तालुक्यातील सोसायटीचे चेअरमन मतदार मोठया संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन भांगे यांनी केले.