राज्यातील शेतकऱ्यांचा पाय अजूनही अतिवृष्टीचा चिखलातच
सौ. माया शेरे भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष यवतमाळ
यवतमाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक 11 रोजी महाराष्ट्र बंद जो पुकारला त्या बद्दल हसावं की रडाव समजेना सौ माया शेरे भाजपा जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी. यु.पी मधल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकार जोर जबरदस्ती ने लोकांना दुकाने बंद करण्यास भाग पाडत आहे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की रोज मजुरी करणारे रस्त्यावर दुकाने लावणारे लोकांना घाबरून दुकान बंद पाडत आहे असे असते का बंद? अरे महाराष्टातील शेतकरी यांचा विचार करा की तुम्ही महाराष्ट्रातील समस्या सोडविण्यात असमर्थ आहात आणि यूपीच्या शेतकऱ्यांसाठी बंद करणार अहो ठाकरे सरकार तुम्ही ज्या वेळेपासून सत्तेमध्ये बसलात त्यावेळेपासून पूर्ण महाराष्ट्र च काय पूर्ण भारतच बंद आहे तुमच्या कार्यकाळात फक्त बंद स्थगिती रद्द पुढे ढकलले जाऊन हीच यांची कामगिरी कोविड मध्ये देशात सर्वात वाईट अवस्था फक्त महाराष्ट्राची झाली सर्व अधिक रुग्ण सर्व अधिक मृत्यू यामुळे महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ बंद होता भाजप सरकारने त्यांच्या काळात S.D.R.F फंडाच्या तिप्पट मदत केली होती पण या सरकारने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली कोविड मध्ये कोणतीही मदत न मिळाल्याने आधीच खचलेल्या शेतकरी त्यात या पनवती
सरकारच्या पायगुणाने मागच्या वर्षभरात आलेली दोन मोठी वादळे अतिवृष्टी सर्वत्र झालेले नुकसान सरकारने स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी केलेली किरकोळ मदत यातूनच आता कुठे इथला मराठी माणूस सावरतोय तर यांना दुसरा राज्यात घडलेल्या घटनाच्या चिंता हे काय चालू आहे या महाराष्ट्रात कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही असली मोगलाई खपून घेणार नाही महाराष्ट्र बंदला माझा तीव्र विरोध होता महाराष्ट्र बंद च्या नावाखाली व्यापारी वर्गावर जोर जबरदस्तीने दहशत माजवली जात आहे उघडपणे पोलिसांसमोर व्यापाऱ्यांवर गुंडागर्दी केली जात आहे ती गाडी सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे जनतेने या बंदला स्वखुशीने विरोध दर्शविला आहे का त्यातून गाडी सरकारच्या नेत्यांनी योग्य तो बोध घ्यावा तिकडे आमच्या शेतकऱ्यांची वाट लागली आहे गेल्या वर्षी पीक विमा दिला नाही या वर्षी मदत जाहीर नाही कसला शेतकऱ्याचा हितासाठी काय तर बंद विरोध दर्शविला आहे का त्यातून हे तीघडी सरकारच्या नेत्यांनी योग्य तो बोध घ्यावा तिकडे आमच्या शेतकऱ्यांची वाट लागली आहे गेल्या वर्षी पीक विमा दिला नाही या वर्षी मदत जाहीर नाही कसला शेतकऱ्याचा हितासाठी काय तर बंद मने राज्यातील शेतकऱ्यांचा पाय अजूनही अतिवृष्टीच्या चिखलातच घट्ट रुतलेला आहे त्यांना आधार द्यायचे सोडून आघाडी सरकार यूपीतील घटनेवरुन महाराष्ट्र बंद पाडत आहे त्यांना युपी येथील शेतकऱ्यांची नाही तर डबघाईला आलेली स्वतःची दुकानदारी वाचविण्याची चिंता आहे.