सर्वसामान्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी न्यायालयीन चळवळ उभारण्याची गरज – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

सर्वसामान्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी न्यायालयीन चळवळ उभारण्याची गरज - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर (प्रतिनिधी) : देशाच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभर 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित केले जात आहेत. ही सर्वांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. आध्यात्मिकदृष्ट्या भगवत्गिता कुराण, बायबल या ग्रंथांना महत्त्व आहे. त्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेला आपण मानतो आणि त्यावरच आपली लोकशाही उभी आहे. तरीही सर्वसामान्य घटकांना योग्य तो न्याय मिळत नाही. ही वास्तव बाब आहे त्यामुळे सर्वसामान्यावरील अन्याय दूर करण्यासाठी राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणच्या माध्यमातून न्यायालयीन चळवळ उभारण्याची गरज आहे असे प्रतिपादन माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले. राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, लातूर व ग्रामपंचायत कार्यालय, कव्हा यांच्या संयुक्‍त विद्यमाने देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कायदेविषय मार्गदर्शन शिबीरात ते अध्यक्षीय समारोपात बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणच्या सचिव एच.डी.औसेकर, अ‍ॅड.किरण चिंते, अ‍ॅड.स्वातीताई तोडकरी, अ‍ॅड.नंदकिशोर पाठक, अ‍ॅड.अंबिका पाठक, अ‍ॅड.अजय कलशेट्टी, अ‍ॅड.मेघा पाठणकर,अ‍ॅड.शैलजा अराध्ये, अ‍ॅड.वैशाली नळेगावकर, अ‍ॅड.अभिषेक शिंदे, उपसरपंच किशोर घार, तंटामुक्‍ती समितीचे अध्यक्ष भागवत घार, सुभाषअप्पा सुलगुडले, मुख्याध्यापिका अरूणा कांदे, शिवशरन थंबा, माजी प.स.सदस्य नेताजी मस्के, गोपाळ सारगे,ग्रामसेवक अनंत सुर्यवंशी, कैलास गरड,लक्ष्मण सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, देश आणि समाज हे आदर्शवान व्यक्‍तीच्या विचारावर चालत असतो. त्या विचारावरच समाजाची वाटचाल यशस्वीपणे सुरू असते. असा एखादा आदर्शवान व्यक्‍ती गेला तरी चालेल पण त्याचे विचार चिरंतर राहणे गरजेचे आहे. असे मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केले.

प्रारंभी प्रमुख मान्यवरांचा कव्हा ग्रामपंचायतीच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक अनंत सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अंबिका पाठक यांनी केले तर अभार उपसरपंच किशोर घार यांनी मानले. यावेळी अ‍ॅड.स्वामी तोडकरी, अ‍ॅड.सुलगुडले, नंदकिशोर पाठक, रसूल पठाण, देविदास करडे, राम घार, सुर्यकांत होळकर, ग्रामसेवक डी.सी.कांबळे, उपसरपंच गुंजरगे, सरपंच गायकवाड, दिपमाला मस्के यांच्यासह महिला व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महिलावरील अन्याय रोखण्यासाठी समाजजागृती गरजेची देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले तरी महिलावरील अन्याय, अत्याचार, हुंडाबळीसारख्या घटना घडतच आहेत. सावित्रीच्या लेकी म्हणून चालणार्‍या या देशात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. ही शोकांतिका आहे. समाजामध्ये लहानपणापासूनच मुलगा आणि मुलगी यामध्य भेदभाव केला जातो. याला आपणच जबाबदार आहोत. वंशाचा दिवा म्हणून मुलांचा उल्‍लेख करतो. परंतु मुलीच्या वंशामुळे दोन्ही घरी प्रकाश मिळतो. ही आनंदाची बाब आहे. हे कोणाच्याही लक्षता येत नाही. यामध्ये बदल होण्यासाठी वैचारिक बदल होणे गरजेचे आहे. त्यामुळे हुंड्यावर होणारा खर्च शिक्षणावर करा. यामुळे मुलींबरोबर समाजही सक्षम होईल. हे वास्तव आहे. त्यामुळे यापुढील कालावधीत तरी महिलावरील अन्याय रोखण्यासाठी समाजजागृती करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणच्या सचिव तथा जिल्हा न्यायाधीश एच.डी.औसेकर यांनी केले.

About The Author