इनरव्हील क्लब, उदगीर तर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान नऊ महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान

इनरव्हील क्लब, उदगीर तर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान नऊ महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान

उदगीर ( प्रतिनिधी ) : उदगीर मध्ये अल्पावधीतच अनेक सामाजिक कार्यात अग्रगणी असणार्‍या इनरव्हील क्लबचा नवरात्र उपक्रम विशेष ठरला.

नवरात्र उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा जागर.कर्ततृव , मातृत्व, नेतृत्व याचा सन्मान.आपल्या असाधारण कर्तृत्ववाने सामाजिक क्षेत्रात स्वतः च विशेष स्थान निर्माण करणार्‍या उदगीर नगरीतील नऊ महिलांचा इनरव्हील क्लब उदगीर तर्फे नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या वेळी मंचावर इनरव्हील क्लब उदगीरच्या अध्यक्षा सौ. मीरा चंबुले, सचिव सौ. शिल्पा बंडे आणि नवदुर्गा म्हणून राजयोगिनी ब्रम्हकुमारी महानंदा दिदीजी ( अध्यात्म क्षेत्र ) सौ. विद्या सुपेकर (न्यायाधीश,दिवाणी न्यायालय, उदगीर),सौ. सुमित्रा वट्टमवार ( राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षिका, उदगीर),सौ. भारती पाटील ( सामाजिक क्षेत्र, सेवानिवृत्त प्राध्यापिका, शिवाजी महाविद्यालय,उदगीर),सौ. अर्चना ताई नळगीरकर ( सुप्रसिद्ध साहित्यिका, उदगीर), सौ. संगीता बागडे(संगीत क्षेत्र, प्राध्यापिका शामार्य कन्या कनिष्ठ महाविद्यालय, उदगीर),सौ. बालिका घोणसे (महिला शेतकरी, उदगीर), सौ. वर्षा भालके ( महिला व्यवसायिक, टॅक्सी/टेम्पो चालक उदगीर), नागम्मा गंदगे ( महिला व्यवसायिक, लिंबू विकण्यचा व्यवसाय, उदगीर) यांची उपस्थिती होती. 

महिला सक्षमीकरण, सुरक्षितता आणि महिलांमधील शक्ती आणि शिक्षण या विषयी या नवदुर्गांनी आपले विचार मांडले.या कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी इनरव्हील क्लब उदगीरच्या सर्व महिला  सदस्यांनी  मेहनत घेतली.यामध्ये सौ. पल्लवी मुक्कावार  यांनी अतिशय सुरेख, आकर्षक सेल्फी पाॅईंट बनवले होते. ज्यांचा आनंद मान्यवरांसह सर्व इनरव्हील सदस्यांनी फोटो काढण्यासाठी घेतला.

About The Author