सुवर्णा ताई देशमुख यांच्या हस्ते जागृती शुगर कारखान्याचे बॉयलर अग्नी प्रदीपन संपन्न

सुवर्णा ताई देशमुख यांच्या हस्ते जागृती शुगर कारखान्याचे बॉयलर अग्नी प्रदीपन संपन्न

विजयादशमीच्या मुहूर्तावर सन्माननीय संचालक मंडळाच्या उपस्थितीत समारंभ संपन्न

देवणी (प्रतिनिधी) : खासगी साखर इंडस्ट्रीजमध्ये मराठवाडा आणि विदर्भ राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक उच्चांक भाव देवून अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रीज या साखर कारखान्य च्या सन २०२१- २२ च्या गाळप हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन विजयादशमी च्या मुहूर्तावर शुक्रवारी जागृती शुगर कारखान्याच्या संचालिका सौ सुवर्णाताई दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, संचालिका सौ सविता लक्ष्मणराव मोरे, संचालक दिलीप माने, संचालिका सौ सविता दिलीप माने, संचालक सूर्यकांत जी करवा, संचालिका सौ शैलजा सूर्यकांत करवा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

याप्रसंगी जागृती शुगर कारखान्याचे सभासद श्री व सौ व्यंकटराव पाटील (बोरोळ) कारखान्यांचे प्रकल्प व्यवस्थापक सुनीलकुमार देशमुख, विविध खाते प्रमूख अधिकारी कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते.

About The Author