कोव्हीड लसीकरणासाठी जनतेनी यंत्रणेला सहकार्य करावे…!

कोव्हीड लसीकरणासाठी जनतेनी यंत्रणेला सहकार्य करावे...!

उपजिल्हाधिकारी प्रविण फूलारी यांचे अवाहन

अहमदपूर (गोविंद काळे) : कोव्हीड लसीकरण आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे असून आता शहर व ग्रामीण भागात विशेष शिबीरे घेवून लसीकरण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून या कामी जनतेनी सूध्दा यंत्रणेस सहकार्य करावे असून अवाहन उपजिल्हाधिकारी प्रविण फूलारी यांनी केले आहे.

तहसिल कार्यालय येथे कोव्हीड लसीकरणा संदर्भात एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते. या प्रसंगी तहसिलदार कुलकर्णी सर, वैद्यकीय अधीक्षक डाॅ.बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.दासरे,नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक सतिश बिल्लापट्टे, गटशिक्षण अधिकारी डोकाडे सर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत बोलताना पूढे उपजिल्हाधिकारी प्रविण फूलारी म्हणाले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे कोव्हीड लसिकरणाला गती देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून या कामासाठी सरपंच, उपसरपंच, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक, जबाबदार नागरीक यांनी विशेष पूढाकार घेणे गरजेचे असून आपल्या प्रभाग, वार्ड यामध्ये कोव्हीड लसीकरणापासून कोणी वंचित रहाणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. कोव्हीशिल्ड आणी कोव्हॅक्सीन ही अत्यंत प्रभावी लस असून नागरीकांनी कूठल्याही अपप्रचाराला बळी न पडता हे डोस घ्यावेत असे अवाहन केले.
या बैठकीला शहरातील नगरसेवक, अधिकारी कर्मचारी यांची उपस्थीती होती.

About The Author