विद्या मंदिर विद्यार्थ्यांनी बहरले
शिक्षणोत्सवानिमित्त’ शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांचे केले पुष्प आणि पेन देऊन स्वागत
परळी (गोविंद काळे) : कोविड कालावधीच्या मोठ्या विश्रांती नंतर आज प्रथमच परळी शहरातील नाथ प्रतिष्ठान संचलीत मिलिंद विद्यालय येथील शाळेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांना न.प.शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी गुलाब पुष्प आणि पेन देत त्यांचे शाळेत स्वागत केले.
कोविडच्या काळात जवळपास दीड वर्ष शाळा बंद राहिल्यानंतर, आता दुसरी लाट ओसरली आहे. राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला .त्यामुळे राज्यात आज शाळा सुरू झाल्या असून राज्यभरात शिक्षणोत्सव साजरा केला जात आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न.प.गटनेते वाल्मीक आण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या सुचनेनुसार नगर परिषदेचे शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी नाथ प्रतिष्ठान संचलीत मिलिंद विद्यालय येथे जाऊन विद्यार्थ्यांचे व गुरुजनांचे पुष्पगुच्छ व पेन देऊन स्वागत केले व शिक्षणोत्सव पुढे अखंडित सुरू राहावा अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक श्री. कोम्मावार आर.जी. , राठोड बी.एस., बीडकर एस.एस., व्हावळे एन.एन., राजनाळे एस.आर. नाकाडे मॅडम, पवार मॅडम, शेप एस.ए, दराडे आर.डी., काळे जे.एन. भोसले मॅडम, पठाण एस.एच. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस बळीराम नागरगोजे, युवक कार्यकर्ते हनुमान आगरकर, पञकार महादेव गित्ते यांच्या सह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.