भाजपा परळी तालुका उपाध्यक्षपदी संजय मुंडे यांची निवड

भाजपा परळी तालुका उपाध्यक्षपदी संजय मुंडे यांची निवड

टोकवाडीत ग्रामस्थाकडून अभुतपुर्व नागरी सत्कार

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे विश्वासू संजय मुंडे यांची भारतीय जनता पक्षाच्या परळी तालुका उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. यानिवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दरम्यान टोकवाडी येथे ग्रामस्थ कडूनही निवडीचे स्वागत करत अभुतपुर्व नागरी सत्कार करण्यात आला. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या सूचनेवरून परळी तालुका भाजपा आणि विविध आघाड्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सतिश मुंडे यांनी एका पत्राद्वारे टोकवाडी येथील पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांचे अत्यंत विश्वासू संजय भास्कर मुंडे यांची भाजपाच्या परळी तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून संजय मुंडे यांची ओळख आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यापासुन अत्यंत विश्वासू कार्यकर्ते आहेत. पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी भाजपमध्ये विविध पदांवर काम केले आहे. कोरोना काळातही त्यांनी चांगल्या प्रकारे चांगले काम केले आहे. संजय मुंडे यांचा तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या व्यापक जनसंपर्काची दखल घेऊन पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी भाजपा परळी तालुक्याची धुरा त्यांच्याकडे देत उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. पंकजाताई आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी भाजपा परळी तालुका उपाध्यक्षपदी निवड करून माझ्यावर खुप मोठा विश्वास टाकला आहे. त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवणार असुन मुंडे भगीनींच्या नेतृत्वाखाली भाजपाचे काम वाढविणार असल्याचे सांगून त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवू असे प्रतिपादन नवनिर्वाचित तालुका उपाध्यक्षपदी संजय मुंडे यांनी केले.

टोकवाडी येथील भाजपाचे कार्यकर्ते संजय मुंडे यांची भाजपाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवडीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करत शाल श्रीफळ, फेटाबांधून तसेच पुष्पहार घालून जंगी नागरी अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. संजय मुंडे यांच्या निवडीने कार्यकर्त्यात आनंद संचारला आहे व मुंडे भगिनींनी केलेली निवडी योग्य असून झालेल्या निवडीत गोरगरीब कार्यकर्त्यांची पाठराखण करणारे शिलेदार निवडल्याने मनस्वी आनंद झाला असल्याचे अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अमर रहे पंकजाताई साहेब मुंडे खासदार प्रितमताई मुंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाने कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला या आनंदोत्सव प्रसंगी टोकवाडी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. ग्रामस्थांनी केलेला सत्कार आणि उस्फुर्तपणे स्वागताने मी भारावून गेलो असल्याचे नवनिर्वाचित तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे यांनी सांगितले आहे.

About The Author

error: Content is protected !!