शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले यांच्या वतीने एस.टी. बस आगार प्रमुख यांना दिले निवेदन

शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले यांच्या वतीने एस.टी. बस आगार प्रमुख यांना दिले निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे) : सहा ते नऊ दरम्यान अहमदपूर ते लातूर शटल सेवा सुरू करण्यात यावी या मागणिचे निवेदन शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले यांच्या नेत्रत्वात शिस्टमंडळाने हे निवेदण दिले आहे. अहमदपुर तालुक्यातील जनतेला सायंकाळी सहा ते नऊ लातूरला जाण्यासाठी बस व्यवस्था नसल्यामुळे शहरातील कामगार तसेच अधिकारी वर्ग व ये-जा करणारे विद्यार्थी तसेच इतर कार्यालयीन व्यक्तींना खूप त्रास सहन करावा लागत होता त्या अनुषंगाने शिवसेनेचे शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले यांनी या संदर्भात आगार व्यवस्थापक मा.श्री. सोनवणे साहेब यांना निवेदन दिले असता त्यांनी त्यांच्या निवेदनावर तात्काळ कार्यवाही करून सहा ते नऊ अहमदपूर लातूर शटल बस सुरू करू अशे आशवाशीत केले आणि आपल्या निवेदनानुसार तात्काळ सेवा सुरू करु असा शब्द दिला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले, युवासेना तालुका अधिकारी रामप्रसाद आय्या, प्रविणजी डांगे, गणेशजी मदने सर, कपिल नाकसाखरे, अजित सांगवीकर, आदि शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author