कोविड योद्ध्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी ५४०विद्यार्थ्यांने लिहीले पत्र

कोविड योद्ध्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी ५४०विद्यार्थ्यांने लिहीले पत्र

जागतिक टपाल दिनानिमित्य यशवंत विद्यालयातील कला विभागाचा नविन्यपूर्ण उपक्रम

अहमदपूर (गोविंद काळे) जागतिक टपाल दिनानिमित्त यशवंत विद्यालय अहमदपूर येथील विद्यार्थ्यांनी कोविड-१९ च्या काळात जनतेची सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचे त्यांनी केलेल्या कार्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी ५४० विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्डवर पत्रे लिहिली. कोविड योद्धा म्हणून पंतप्रधान ,आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी कार्यालय,शिक्षणाधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय,ग्रामीण रुग्णालय,पोलिस स्टेशन, नगरपालिका,बसस्थानक आगार प्रमुख,पोस्ट कार्यालय,शहरातील हाँस्पिटल,दानशूर व्यक्ती तसेच आँनलाईन अध्यापन करणारे शिक्षक बांधव एमएसईबी कार्यालय,अशा विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त ऋण व्यक्त करणे एक कर्तव्य समजून विद्यार्थ्यांने मोठ्या संख्येने पोस्ट कार्डावर पत्र लिहून पोस्टाने पाठवून देण्यात आले. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना व्यवहारिक पत्र लेखनाचा अनुभव मिळावा,तसेच लोप पावत चाललेली पोस्टकार्ड व टपाल विभागाचे कार्य याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी. जागतिक टपाल दिन उत्साहाने साजरा व्हावा या हेतूने कलाशिक्षक महादेव खळुरे यांनी पोस्ट कार्ड उपलब्ध करुन देऊन विद्यार्थ्यांना त्याबद्दल महत्त्व पटवून दिले.

डाक विभागातील ५० पैशाचे कार्ड भारतातील कोणत्याही कोपऱ्यात कार्यालयामार्फत पोहचविण्यात येते.यासाठी पोस्टमँन दादा सेवा बजावत असतात.या तंत्रज्ञानाच्या यूगात मोबाईल,मेल,वाँट्सअँप द्वारे आपण संवाद साधत आहोत यामुळे पत्राचे महत्त्व कमी होत गेल्याचे दिसून येत आहे.हा पारंपरिक व पत्र लेखन कला वृध्दिंगत करणे,पत्राचे महत्व वाढविणे,डाक विभागाच्या कार्याबद्दल ओळख करुण देणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. वरील उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव शिक्षण महर्षी डी.बी.लोहारे गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.व्ही.गंपले उप मुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे पर्यवेक्षक उमाकांत नरडेले,दिलीप गुळवे आदिनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

About The Author