पोस्ट कार्डवरील पत्र लेखन स्पर्धेचे निकाल जाहिर
अहमदपूर (गोविंद काळे) : सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मुक्रमाबाद च्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जागतिक पोस्ट कार्ड दिन(१आँक्टोबर)व जागतिक टपाल दिन(९आँक्टोबर) या दिनाचे औचित्य साधून पोस्ट कार्डवरील ‘पत्र लेखन स्पर्धा’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा निकाल यूटूब लिंकच्या माध्यमातून घोषित करण्यात आला. सृजन संस्थेने टपाल विभागाचे व लोप पावत असलेल्या पोस्ट कार्डचे महत्व वाढावे.मुलांना पत्र लेखन कला अवगत व्हावी.या उद्देशाने “पत्र लेखन” स्पर्धेचे आयोजन केले होते.शालेय अभ्यासक्रमात पत्र लेखन हा घटक आहे. याचा अभ्यास व्हावा,पत्र लेखनाचा अनुभव लहान मुलांना पहिल्यांदाच घेता यावं म्हणून हा अनोखा उपक्रम राबविला आहे. अशा या नाविन्यपूर्ण शैक्षणिक व राष्ट्रीय कार्यात ११५ मुलांनी सहभाग नोंदविला.या पत्र लेखन स्पर्धेसाठी १)एक पत्र व्यसनमुक्तीसाठी.२)पोस्टमन दादा यांना त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता/ आभार पत्र.३)लाँकडाऊन काळात आँनलाईन शिक्षण देणाऱ्या गुरुजींना पत्र. या तीन विषयावर पोस्ट कार्डवरच पत्रलेखन करुन त्या पत्राचा फोटो पाठवून या स्पर्धेत सहभाग नोंदवायचा होता. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले नव्हते.
सदरील स्पर्धा ही आँनलाईन पद्धतीने राबविण्यात आली होती. या स्पर्धेत लहान गटातून प्रथम-आयुष्य विजय चव्हाण, द्वितीय- तेजल सुनिल जगदाळे, तृतीय सृष्टी संजय भोसले तर मोठ्या गटातून प्रथम-वेदिका वैभव जोशी यांना पारितोषिक प्राप्त झाले आहेत. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आँनलाईन ई-प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना फोन पे द्वारे रोख रक्कम व गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, किरण खमितकर, महादेव खळुरे, अविनाश धडे, शिवकुमार पवार, सलिम आतार, मल्लपा खळुरे, गौरव चवंडा आदिनी परिश्रम घेतले.