दिलीप बेल्लाळे यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

दिलीप बेल्लाळे यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

हमदपूर (गोविंद काळे) : यशवंत ज्यूनिअर होकेश्नल (व्यावसाईक अभ्यासक्रम) काँलेज अहमदपूर येथील पुर्ण वेळ शिक्षक (FTT) यांनी टागोर शिक्षण समिती अहमदपूर या संस्थेत सन 1992 ते 30 सप्टेंबर 2021 असे 29 वर्ष सेवा पुर्ण केली. ते आज प्रदिर्घ सेवेतून सेवा निवृत्त झाले.दि. 30 सप्टेंबर रोजी सेवापूर्ती सत्कार सोहळा सस्थेचे सचिव शिक्षण महर्षी डी.बी.लोहारे गुरुजी व सौ.पुष्पाताई लोहारे यांच्या हस्ते हा कार्यक्रम कोविड 19 चे सर्व नियम पाळून पार पडला.

यशवंत परिवाराच्या वतीने विद्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष टागोर शिक्षण समितीचे सचिव, शिक्षण महर्षी, दलित मित्र डी.बी.लोहारे गुरुजी व सौ. पुष्पाताई लोहारे यशवंत ज्यूनिअर काँलेजचे प्राचार्य व्ही.व्ही गंपले, उप प्राचार्य बालाजी गोडभरले, उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे प्रमुख पाहुणे माजी केंद्र प्रमुख मोहनराव जाधव,गोविंदराव बेल्लाळे, थोंडीराम घोटे, चि.गणेश बेल्लाळे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पुर्ण वेळ शिक्षक दिलीप काशिनाथ बेल्लाळे व सौ.ललिता बेल्लाळे यांचा सपत्निक शाल, श्रीफळ, पुष्पहार व राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची प्रतिमा भेट देऊन भव्य सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी श्री व सौ बेल्लाळे यांना पुढील निरोगी व सुखीआयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्तविक व्ही व्ही गंपले सुत्रसंचलन कपील बिरादार तर आभार राजकुमार पाटील यांनी मानले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!